महाराष्ट्र

ठाणे- पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्र वाढविण्याची राहुल परदेशी यांची मागणी


झूम मराठी न्यूज नेटवर्क

ठाणे (झूम मराठी) ठाणे- पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढी पतपेढी निवडणूकीसाठी मतदान केंद्र वाढविण्याची मागणी भटक्या विमुक्त जाती/ जमाती/ विशेष मागास प्रवर्ग या राखीव गटातून निवडणूक लढविणारे उमेदवार तथा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक महासभेचे जिल्हाध्यक्ष राहुल परदेशी यांनी पतपेढीच्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे निवेदन देऊन केली आहे. 

राहुल परदेशी यांनी निवेदन देऊन मागणी केली आहे की, ठाणे- पालघर शिक्षक पतपेढीच्या जेथे शाखा आहेत त्या सर्व‌ ठिकाणी मतदान केंद्र सुरू करण्यात यावीत, सर्व‌ तालुक्याच्या ठिकाणी मतदान केंद्र सुरू करण्यात यावीत तसेच ठाणे व पालघर जिल्ह्यातील आदिवासी दूर्गम भाग लक्षात ठाणे जिल्ह्यातील किन्हवली (शहापूर) व टोकावडे (मुरबाड) तसेच पालघर जिल्ह्यातील कासा (डहाणू) मनोर ( पालघर) या ठिकाणी मतदान केंद्र सुरू करावीत अशी मागणी निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडे केली आहे. याचबरोबर जव्हार, मोखाडा व विक्रमगड या तीन तालुक्यांसाठी एकच मतदान केंद्र असून शिक्षक मतदानापासून वंचित राहू नयेत याची नोंद‌ घेऊन आवश्यक ती उपाययोजना करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे