१ मे जागतिक कामगार दिन…
१ मे हा जागतिक कामगार दिन (World Labor Day) असून योगायोगाने महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्ध अनेक देशात औद्योगिकरणाचा प्रारंभ झाला होता. मालकशाही, भांडवलशाही, ही अमेरिके सारख्या देशात प्रस्थापित झाली होती. मालक धार्जिणे सरकार सत्तारूढ झाले होते. कामगारांना, कष्टकरी जनतेला, आपला उदरनिर्वाह करण्यासाठी कारखान्यांमध्ये १२ तास काम करावे लागत असे. इ.स.1806 मध्ये फिलाडिलफीया येथील जोंड्याच्या कारखान्यात कामगारांनी हरताळ केली असताना झालेल्या चौकशीत असे आढळून आले की, कामगारांना वीस तासापर्यंत कामाला ठेवण्यात येत असे.
कामाचे किमान तास सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत असायचे. थोडक्यात गुलामाचे जीवन त्यांच्या नशिबी आले होते. त्याच वेळी कामगारांमध्ये अन्याय व अत्याचाराविरुद्ध, असंतोष उफाळून प्रतिकार यांची भावना निर्माण होऊ लागली होती. मधूनमधून कारखान्यांमध्ये हरताळ, संप व त्यांची आंदोलने होत होती. कामगारांची एकजुटीची प्रक्रिया सुरू होती. अमेरिकेतील ६० मजदूर संघटनांच्या प्रतिनिधींनी 20 ऑगस्ट 1866 रोजी, बाल्टिमोर येथे एकत्र येऊन नॅशनल लेवलवर यांची स्थापना केली आणि असा ठराव पारित केला की, अमेरिकेत सर्वत्र कामाचा दिवस ८ तासाचा निर्धारीत करण्यात यावा तसेच कामगार वर्गाने ही मागणी मंजूर करून घेण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली. या ठरावाला प्रतिसाद देण्यासाठी सर्वत्र हरताळ, संप, निषेध, प्रचारसभा, या मार्गाने आंदोलनाचे पर्व सुरू झाले होते. अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेने असा संकल्प जाहीर केला १ मे 1866 पासून सर्व कामगारांसाठी ८ तासात कामाचा दिवस लागू करण्यात यावा. या मागणीच्या समर्थनार्थ १ मे दिवशी शिकागो शहरात भव्य आयोजन करण्यात आले. त्यात पाच लाख कामगारांनी भाग घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कामगार एक चुकीची प्रक्रिया इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्पेन इत्यादी युरोपियन देशांमध्ये सुरू झाली होती. १ मे दिनाची स्मृति ज्योत प्रज्ज्वलित ठेवण्यासाठी अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर या संघटनेने शहरी डिसेंबर 1888 मध्ये भरविण्यात आलेल्या अधिवेशनात १ मे या कामगार दिवस संपूर्ण अमेरिकेत पाण्याची घोषणा दिली. दुसऱ्या सामाजिक आंतरराष्ट्रीय कामगार परिषदेच्या परीक्षेतील अधिवेशनात १ मे हा जागतिक कामगार दिवस पाळण्याची घोषणा 1890 मध्ये करण्यात आली.
भारतामध्ये हा दिवस सर्वत्र पाळण्यात येतो. कामगार वर्ग आठ तासाचा दिवस ही मागणी मिळविण्यात बिझी झाला खरा परंतु त्याकरिता काही नेत्यांना आपल्या प्राणांचे मोल द्यावे लागले आहे. अशी आहे कहानी १ मे दिनाची. कामगार चळवळीचा उत्पत्ती ही शोषणातून झालेली आहे. मालक धार्जिण्या व पारतीय सत्तेकडून त्या काळात अन्याय, अत्याचार, व शोषणाविरुद्ध कामगारांची अस्मिता जागृत करून व त्याच्यातील संघटीत शक्तीला प्रवृत्त करण्यासाठी ज्या ज्ञात-अज्ञात नेत्यांनी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती दिली. कष्ट उपसले व कामगार कल्याणासाठी साठी सर्वस्व अर्पण केले व सर्व कामगारविरांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस आहे. हक्काबरोबर कर्तव्याची जाण ठेवून शोषितांना शोषण मुक्त करण्यास संघटित व्हा व संघर्ष करा असा १ मे दिनाच्या जगातील कामगारांना संदेश आहे. आम्ही ऐतिहासिक १ मे ला आमचा सलाम व प्रणाम !
हरिभाऊ नाईक
(लेखक ज्येष्ठ कामगार नेते व सामाजिक कार्यकर्ता)




