महाराष्ट्र

श्री बिरोबा यात्रेनिमित्त आरेवाडी बनात मोफत आरोग्य शिबीर संपन्न

आरोग्य शिबीरामध्ये १५ पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या इतर स्टाफ यांनी ५०० पेक्षा जास्त व्यक्तींची आरोग्य तपासणी केली


झूम मराठी

आरेवाडी (कवठेमहांकाळ)- सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी गाव म्हटले, की डोळ्यांपुढे उभे राहते बिरोबा देवस्थान. बिरोबा हे धनगर समाजाचे आराध्य दैवत मानले जाते. श्री बिरुदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली धनगर काशी आरेवाडी बिरुदेवाची यात्रा ०६ एप्रिल ते ०८ एप्रिलला लाखो भक्तांच्या उपस्थित भक्तिमय वातावरणात पार पडली. यात्रा म्हंटले की हवशे, गवशे आणि नवशे आलेच पण या हवशा, गवशा आणि नवाश्यांच्या आरोग्य सेवाचा वसा घेतलेले डॉक्टर आपण ज्या समाजातून जन्माला आलो त्या समाजाचे काही देने लागतो आणि त्या पेक्षा ही जादा समाज सेवेचा वसा घेतल्या कारणाने समाज सेवेसाठी मागील दशका पासून आपली सेवा बिरोबा भक्तजनांना आरेवाडीच्या बनात देत आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या बिरुदेच्या बनात भकांची सेवा करण्यासाठी येतात

यामध्ये प्रामुख्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेडिकल असोसिएशन, मुंबई चे डॉ. अरूण गावडे  आणि कृष्णा येरळा प्रतिष्ठान, सांगली चे डॉ. दिलीप मगदूम यांचा सिंहाचा वाटा आहे. या आरोग्य शिबीरामध्ये १५ पेक्षा जास्त तज्ञ डॉक्टर आणि त्यांच्या इतर स्टाफ यांनी ५०० पेक्षा जास्त व्यक्तींची आरोग्य तपासणी केली यामध्ये साध्या आजारापासून ते प्रदीर्घ आजार असणाऱ्या व्यक्तींचासुद्धा समावेश होता. विशेष करून दंत तपासणी आणि जाग्यावरच दात काढणे आणि त्यावर उपाय करणे यासारखे उपचार सुध्दा या आरोग्य शिबिरात समाविष्ट होते. या शिबिरात येणार प्रत्येक व्यक्ती हा वेदना घेऊन येत होता पण जात असताना मात्र मला काहीतरी मिळाले आहे हे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर घेऊन जात होता आणि हे पाहणाऱ्या व्यक्तीला लगेच उमजत होते हे या आरोग्य शिबिराचे खास वैशिष्ट्य होय.


आरोग्य शिबिराचे उद्घाटन हे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्य शिबिराचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अरुण गावडे, दंतरोग तज्ञ डॉ. दिलीप मगदूम, डॉ. सुनील मगदूम, डॉ. विक्रम कोळेकर, डॉ. श्रीनिवास माने, डॉ. सखाराम गारळे, डॉ. प्रमोद गावडे, डॉ. सुनील लवटे, डॉ. शिवाजी काळे, डॉ. वर्षा चौरे, डॉ. उषाताई देशमुख, डॉ. नामदेव देशमुख व डॉ. आदर्श गावडे, डॉ. विक्रांत बंडगर आदी तज्ञ डॉक्टर्स यांनी सहभागी होवून आरोग्यसेवा दिली.

आरोग्य शिबिरासाठी श्री बिरोबा देवस्थान ट्रस्ट, आरेवाडी बन आणि पुजारी मंडळी यांच्या कडून विशेष सहकार्य मिळाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे