आपल खान्देश

भडगांव -एकवीरा नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जयंती व सत्कार समारंभ उत्साहात साजरा


भडगांव शहारातील एकवीरा नगर मधील एकवीरा देवीच्या प्रांगणात थोर समाज सुधारक स्त्री शिक्षणाचे उद्गाते,क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जंयती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी डाॕ.सौ पुनमताई पाटील (संचालीका-जळगांव जिल्हा दुध संघ),सौ.योजनाताई पाटील (मा.नगरसेविका),सौ,मनिषा पाटील व सौ.संगिता अनिल महाजन (सायगावकर) यांच्या हस्ते प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तसेच जयंतीचे औचित्य साधुन  लोकमत वूमन अॕच्युअर_ पुरस्कार मिळाल्याबद्दल डाॕ.सौ.पुनमताई पाटील (संचालीका-जळगांव जिल्हा दुध संघ)यांचा सत्कार सौ.संगिता अनिल महाजन यांच्या हस्ते करण्यात आला,राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.योजनाताई पाटील (मा.नगरसेविका)यांचा सत्कार सौ.मथुराबाई बाविस्कर यांच्या हस्ते तर अहीराणी साहितीक पुरस्कार मिळाल्यामुळे सौ.मनिषा पाटील यांचा सत्कार सौ.सुनंदा महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी डाॕ.सौ पुनमताई पाटील यांनी महीलांना ज्योतिबा फुले व सावित्री फुले यांनी केलेल्या कार्याविषयी महत्व सांगुन महीलांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सौ.वैशाली बाविस्कर यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी व आयोजन सौ.संगीता महाजन व एकवीरा नगर महीला भगिनी यांनी केले.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे