आपल खान्देशगुन्हेगारी

पाचोरा खून – बापाचा आईवर चारित्र्य संशय…अन मुलानीं काढला बापाचा काटा…!

पाचोरा (झूम मराठी) आईच्या चारीत्र्यावर वडिलांनी संशय घेतल्यामुळे पोटाच्या मुलांनीच आपल्या बापाचा धारदार चाकूचे सपासप वार करत खून केल्याची धकाकदायक घटना पाचोरा शहरात घडली आहे. ही धक्कादायक पाचोरा शहरातील भास्कर नगरात रविवारी मध्यरात्री घडली. संजय बंकट खेडकर (४६) असे खून झालेल्या इसमाचे नाव असून खून प्रकरणी संशयीत आरोपी रोहित खेडकर (२२) व प्रतीक खेडकर (२४) या भावंडांना अटक करण्यात आली आहे.

पाचोरा शहरातील भास्कर नगरात खेडकर कुटुंब वास्तव्यास आहे. संजय खेडकर हे इलेक्ट्रीकल व्यावसायीक असून त्यांचे पाचोरा शहरात इलेक्ट्रीक दुकान आहे. खेडकर हे पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत असल्याने कुटुंबात शनिवारी रात्री जोरदार भांडण झाले व मध्यरात्री पर्यंत हा प्रकार सुरूच होता. आईच्या चारीत्र्यावरील संशयामुळे चिडलेल्या संशयीत रोहित व प्रतीक यांनी घरातील धारदार चाकूने वडिलांच्या पोटावर, पाठीवर व डोक्यावर सपासप वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सकाळी ही घटना उजेडात आल्यानंतर पोलिस उपअधीक्षक भारत कातकाडे, पोलिस निरीक्षक नजन किसन पाटील व कर्मचार्‍यांनी धाव घेतली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे