महाराष्ट्रराजकीय

मंत्रालयात दारूच्या बाटल्या, प्रवीण दरेकर, चित्रा वाघांची राज्य सरकारवर जोरदार टीका!

मुंबई। राज्यात आज एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने आता सर्वत्र जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तर, हा प्रकार समोर आल्यानंतर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आता महाविकासाआघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, “महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासणारी अशी घटना आज समोर आली आहे, असं म्हणत दरेकर यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी व्हावी.अशी मागणी केली आहे.

दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात

“मंत्रालयामध्ये दारूच्या बाटल्या सापडणे अत्यंत दुर्दैवी, चीड आणणारी आणि शरम आणणारी अशी घटना आहे. राज्यामध्ये कोविड परिस्थिति बरोबर पूरग्रस्त परिस्थिति उभी आहे. एका बाजूला मंत्रालयामध्ये सर्वसामान्य लोकांना प्रवेश मिळणं आपल्या न्यायहक्कासाठी दुरापास्त असताना दारूच्या बाटल्या मंत्रालयांमध्ये कशा पोहचू शकतात?” असा सवाल दरेकरांना केला आहे.

संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे

तसेच, “दारूच्या बाटल्या मंत्रालायामध्ये कोणी आणल्या आणि कशासाठी आणल्या? या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर कारवाई झालीचं पाहिजे. या प्रकरणावरून सरकारची मानसिकता, सरकारचा कारभार कोणासाठी, कशासाठी चालला आहे हे दिसून येत आहे. हे सरकार नेमकं कोणासाठी काम करत आहे. धनदांडग्यांसाठी करतंय, दारू विक्रेतयांसाठी करतंय, डान्स बार वाल्यांसाठी किंवा रेस्टोरंट वाल्यांसाठी काम करत आहे, की सर्वसामान्य नागरिकांसाठी काम करतंय हे एकदा जनतेला कळलं पाहिजे.”असंही प्रवीण दरेकर यांनी बोलून दाखवलं आहे.

सर्वसामान्यांना तपासणी शिवाय सहजासहजी प्रवेश न मिळणाऱ्या राज्याच्या मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्याची बातमी वृत्त एबीपी माझाने दिले होते आणि मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमुर्तीच्या मागील बाजूस दारूच्या बाटल्यांचा खच कॅमेऱ्यात कैद झाला असल्याचे दाखवले गेले आहे. हा प्रकर समोर आल्यानंततर एकच खळबळ उडाली असून, मंत्रालयात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले असताना व तपसाणी केली जात असातनाही, एवढ्या दारूच्या बाटल्या आल्या कशा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. तसेच, या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल आणि हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

चित्रा वाघ देखिल संतापल्या

प्रत्येक राज्यातल्या नागरिकाची मान शरमेने खाली घालणारी ही घटना असल्याचे चित्रा वाघ यांनी नमूद केले. तर जिथून राज्याचा कारभार चालतो तिथे इतका कडेकोट बंदोबस्त असतानाही बाटल्या मध्ये गेल्या कशा याचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला अपेक्षित आहे असं चित्र वाघ म्हणाल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे