आरोग्य व शिक्षण

कौतुकास्पद – पाचोऱ्यातील वैष्णवी महाजन हिने पीएचडी पदवी संपादन केली.

झूम मराठी

पाचोरा शहरातील डॉ. वैष्णवी संदीप महाजन यांना पि.एच.डी (मॅथ) विषयाची पदवी प्रदान करण्यात आली उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात डॉक्टरटे होणारी पहीली विद्यार्थीनी ठरली आहे तिचे कौतुक होत आहॆ.

पाचोरा तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहीवाशी असलेले व हल्ली मुक्काम पाचोरा जिल्हा जळगाव येथील रहिवाशी स्वातंत्र्य सैनीक आणि पाचोरा नगर पालिका माजी ऑक्ट्रॉय इन्स्पेक्टर स्व. दामोदर लोटन महाजन यांची नात तर अखिल भारतीय गुर्जर परिषदेचे राष्ट्रीय सचिव न्यु. दिल्ली, ध्येय करिअर अँकेडमी तथा ध्येय न्युज चॅनलचे संचालक संदीप दा. महाजन व पाचोरा श्री.गो. हायस्कुलच्या इंग्रजी विषयाच्या उप- शिक्षीका सौ.शितल सं.महाजन यांची मोठी कन्या कु.डॉ. वैष्णवी संदीप महाजन हिने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मधुन गणितात (A+) पदवी तर M.Sc (A+) तसेच B.Ed (A++) यश प्राप्त करून गणित विषयात तिने J.J.T.U. येथुन Certain Investigations On Algebraic Structure Of Groups And Rings या विषायात संशोधन करून वयाच्या २६ वर्षी Ph.D. होण्याचा मान पटकावला.

आज दिनांक ०६ मार्च रोजी JJTU येथे एंकर आणि राईटर हरीश भिमानी यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. विनोद टिबडेवाल, आय. जी. सुरेंद्रकुमार गुप्ता,सी.आर.पी.एफ डी. आय.जी. नरेंद्रसिंह खासदार नरेंद्रजी खिचड, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रदीप शर्मा, डॉ. मधु गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थीत कु.डॉ. वैष्णवी यांना पि.एच.डी (मॅथ) विषयाची पदवी प्रदान करण्यात आली उत्तर महाराष्ट्रात सर्वात कमी वयात Doctorate होणारी पहीली विद्यार्थीनी ठरली आहे . कु.डॉ. वैष्णवी हल्ली पाचोरा येथील श्री. शेठ एम. एम. कॉलेज मध्ये सिनीअर कॉलेजला गेल्या तिन वर्षा पासुन मॅथ विभागाचे HOD म्हणुन कार्यभार सांभाळत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे