ब्रेकिंग

या पुरुष प्रधान संस्कृतीत आजची महिला सुरक्षीत आहे का?

सुवर्णा साबळे यांचा जागतिक महिला दिनविशेष लेख


पाचोरा (प्रतिनिधी) 8 मार्च जातिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो पण तरी मनात एक प्रश्न निर्माण होतो. कि या
पुरुष प्रधान संस्कृति मध्ये आजची महिला सुरक्षीत आहे का ? आज हि स्त्री कडे पाहताना तिच्याकडे अबला म्हणुन पाहिले जाते. तिला कमी लेखले जाते पण खरे पाहिले तर ति कधी अबला नव्होती ती अगोदर पासुन सबला होती. आज ही आहे आणि उदया ही ती सबलाच राहनार कारण ती कोणतेही काम स्वता:च्या हिमतीवर करत असते आणी ते काम
करत असताना अपले अस्तितव देखील ती टिकउन ठेवते तसे पहीले तर या पुरुष प्रधान संस्कृति मध्ये देखील तिने पुरुषाना यशस्वी करण्यासाठी ठोस पावले उचलो आहे आणी उचलत आली आहे…
उद: हिंदवी स्वराज्या चे संस्थापक शिवाजी महाराज याना घडविले त्याच्यां आई *जीजाबाई* यानी, कर्मविर भावराव पाटिल याना त्याच्या शैक्षनिक कार्यात मोलाची साथ दिली ती त्यांच्या धर्मपत्नी *लक्ष्मीबाई* ती तसेच भारतीय राज्य घटनेचे शिलपकार महामानव डॉ. बाबा साहेब अबेंडकर याच्या पाठिशी खबिरपणे उभ्या राहिल्या त्या माता *रमाबाई* , तसेच लेकमान्या टिळलाच्या बरोबरीने काम करत राहिल्या त्या म्हणजे सावित्रीबाई फुले असे भरपुर, उद; अपल्याला देता
येतील. तसेच आज देखील सागांयचे झाले तर आजची स्त्रि पुरुषा च्या बरोबरीने काम करताना
दिसत आहे. आणी प्रतेक क्षेत्रात ती प्रगतिपथावर कार्यरत आहे. उदः ती शिक्षीका, डॉ, ग्रामसेवक, सरपच, तलाठि, पायलट, डरायवर, खेळाडु, कलेकटर, ईतकेच नव्हे तर, शेतातील मजुरापासुन ते राष्टपती पदा पर्यत ती पोहचली आहे. व यशस्वी भुमिका ती निभनताना दिसत आहे आणी तरीदेखील
अपन कमी लेख्त आहोत…. “स्त्रि ही अगाध शक्तिचे रूप आहे” ती प्रतेक संकटाशी न घाबरता लढत असते लढा देताना ती स्वता; च्या जिवाचा विचार सुध्दा ती करत नाही. म्हणुनच *हिरकनी* सारखी आदर्श आई अपल्या डोळयासमोर उभी राहाते जी रायगडाचा उभा कडा उतरुन खाली आली. *झाशीच्या* राणीने तर बाळ पाठिशी बांधून लढाई जिकली आणी अता चालुचे
उदः दयायचे झाले तर *सिंधुताई* *सपकाळाचे** देता येईल त्यांनी स्वतावर झालेला अन्याय बाजुला ठेउण हजार अनाथ बालकाच्या त्या आई झाल्या त्यंनी अश्रुनांहि दरडाउण् सांगितले. ” *डोळयातिल* *असवानो वाहु नका, अंतरीच्या* *वेदनाना जागा* *देवु* *नका* “. असे अनेक प्रकारच्या कर्तृत्ववान स्त्रिया या होउन गेल्या आजहि आहे आणी उदयाहि होतिल आणी तरी देखील अपण तिला अबला म्हनुण पाहतो तिला चुकीच्या पधतिने वागवतो.तिला तुच्छा लेखतो. आणी तिला हिनप्रकाची
वागनुक देतो आणी स्वता;च्या हक्कासाठी मनाप्रमाने राहन्यासाठी देखील तिला या 365 दिसातुन एक दिवस मागावा लागतो हि एक मोठी शोकांतिका आहे.विचार करन्याची बाब आहे शेवटि एकच सांगावेसे वाटते कि.” *स्त्रि जन्मा हि तुझी कहानी,हृदयी* *अर्मुत नयनी* *पानी* ” कारण या विज्ञानाच्या युगात देखील आणी या 21 व्या शतकात अधुनिकतेचे वारे सर्वत्र
वाहत असताना देखील आजची स्त्रि सुरक्षीत नाहि आजहि बरयाच मुलीनां हुडांबळी जातानां अपल्यला दिसत आहे. लैंगिक अत्याचार होताना दिसत आहे तिला बाहेर जताना सहारा लागत आहे. लिंग तपासनी करुण तिला गर्भातच मारले जात आहे.आणी हे सर्व ती सहन करत आहे. आणी हे सर्व पाहुण मनात प्रश्न येतो कि खरच स्त्रि स्वतंत्र आहे का? खरच स्त्रि सुरक्षीत आहे का ? आणी या प्रश्नांची उतर कदापीही मिळत नाहि. आणी अपण निरउत्त्र राहतो…..
Suvama A. Sawle
(Psychologist)
District Disability Rehabilitation Centre Jalgaon
9975997764

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे