गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

धक्कादायक – ठाण्यात शिवसैनिकांवर शाखेत जीव घेणा हल्ला!

ठाण्यात शिवासैनिकांचा शाखेत जीव घेणा हल्ला 

झूम मराठी न्यूज ठाणे – गेल्या दोन दिवसात अवघ्या महाराष्ट्रात भाजपा – सेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आता विरोध प्रदर्शन नाही तर थेट हल्ल्याच्या घटना समोर येत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेमुळे आता भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटला आहे. ठाण्यात शिवसेनेच्या शाखेत घुसून शिवसेना विभाग प्रमुखावर जीवघेणा हल्ला झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमुळे ठाण्यात खळबळ उडाली आहे,

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील शिवसेना शाखेचे शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. ठाण्यातील श्रीरंग सोसायटीमधील शिवसेना शाखेत ही घटना घडली.रात्री ८-30 दरम्यान शिवसेना शाखेत घुसून हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे. हल्लेखोरांनी चॉपरच्या साह्याने चार ते पाच सपासप वार केले.

या हल्ल्यात जखमी झालेले अमित जयस्वाल यांना तातडीने ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी शिवसेना शाखेवर धाव घेतली असून कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे