मराठवाडामहाराष्ट्र

नगर शहरातील ‘ तो ‘ मृत्यूचा सापळा अखेर हटवला, काय आहे प्रकरण ?

झूम मराठी वृत्तसेवा

नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात उभा असलेला तो मृत्यूचा सापळा या संदर्भातील बातमी नगर चौफ़ेरने प्रकाशित केली होती त्यानंतर त्याची दखल घेण्यात येऊन प्रोफेसर कॉलनी चौक येथील लोखंडी कमानी शेजारील कमानीपासून अवघ्या दोन ते तीन फुटावर असलेल्या विद्युत तारा अखेर काढून टाकण्यात आल्या आहेत. एका युवकाचा मृत्यू झाल्यानंतर देखील कधी महापालिका तर कधी महावितरण यांच्यामध्ये या विषयावरून टोलवाटोलवी रंगलेली होती मात्र अखेर महावितरणने विद्युत तारा काढून टाकल्या असून नागरिक देखील समाधान व्यक्त करत आहेत.

काय आहे प्रकरण ?

अ. नगर शहरातील प्रोफेसर कॉलनी चौकात उभारण्यात आलेल्या कमानीवर जाहिरातीचा फ्लेक्स लावताना अवघ्या काही दिवसांपूर्वी सौरभ चौरे ( वय 22 राहणार नालेगाव अहमदनगर ) मधील युवकाचा कमानी शेजारून जात असलेल्या विद्युत तारेचा शॉक बसून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. घटनेनंतर शहरात मनपाच्या कारभाराची आणि विद्युत वितरणच्या निष्काळजीपणाची चांगलीच चर्चा झाली मात्र त्यानंतर देखील सदर ठिकाणी काहीही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या त्यामुळे प्रोफेसर कॉलनी चौकात असलेला हा मृत्यूचा सापळा तसाच राहिलेला होता

सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. होती. सदर प्रकरणी महापालिका आणि महावितरण यांच्या अधिकाऱ्यांकडून नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी सुरू झालेली पहायला मिळाली. भर चौकात अक्षरश: विद्युत तारांना खेटून ही कमान उभी करण्यास परवानगी कुणी दिली ? दिलेल्या परवानगी प्रमाणेच नियमाने ही कमान उभारण्यात आली आहे का ? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला होता.

सौरभ सुरेश चौरे ( वय 22 राहणार नालेगाव अहमदनगर ) हा युवक पहाटेच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसाचा फलक लावण्यासाठी प्रोफेसर कॉलनी चौकात असलेल्या लोखंडी कमानीवर चढला होता. कमानी पासून अक्षरश: एक ते दीड फूट अंतरावर असलेल्या विद्युत तारांना त्याचा स्पर्श झाला आणि तो झटका बसून खाली पडला त्यामुळे त्याचा जागेवरच मृत्यू झाला होता.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे