आपल खान्देश

भडगाव पाचोरा दरम्यान अपुरे रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणून पाचोरा जागृत मंचाचे सदर रस्त्यावर उपोषण सुरु!

भडगाव पाचोरा दरम्यान रस्त्याचे काम अपुरे सोडले असल्याने तो स्पॉट मृत्यूचा सापळा बनू पाहतोय!

भडगाव पाचोरा दरम्यान अपुरे रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणून निलकंठ पाटील व नाचणखेडा चे गुलाब पाटील २४ तारखेपासून त्याच स्पॉट वर उपोषण करीत आहेत.

भडगाव पाचोरा दरम्यान रस्त्याचे काम अपुरे सोडले.भडगाव कडून पाचोरा कडे जातांना तितूर नदीच्या पुलावर रस्ता अचानक बंद आहे.त्यामुळे वाहन सरळ खड्यात पडते किंवा उजवीकडे वळून विरूद्ध वाहनाला ठोकते.

यामुळे येथेच नाचणखेडा येथील आयटीआय विद्यार्थी मनोज अजाबसींग पाटील अपघातात बळी गेला, आजून किती बळी घेणार??

असा एक नाही, बारा माणसे दोन वर्षात नाहक बळी गेली. म्हणून पाचोरा जागृत जनमंच चे अध्यक्ष निलकंठ पाटील यांनी हा सरकारी मौतका कुवा महिनापुर्वीच लोकांच्या नजरेत आणला. नेत्यांच्या नजरेत आणला. तरीही स्थानिक लोक प्रतिनिधी आपापल्या कामात दंग आहेत, आणि इकडे माणसे प्राण गमवत आहेत असे उपोषण कर्ते नीलकंठ पाटील व गुलाब पाटील यांनी बोलतांना सांगितले.

आता तरी नेत्यांना जाग यावी, अपुरे रस्त्याचे काम पुर्ण करावे म्हणून निलकंठ पाटील व नाचणखेडा चे गुलाब पाटील २४ तारखेपासून त्याच स्पॉट वर उपोषण करीत आहेत.


रस्त्यावर जाणारे येणारे संताप व्यक्त करीत आहेत. उपोषणाला पाठिंबा देत आहेत. हे काम झालेच पाहिजे, असे सर्व सामान्य लोकांची आर्त हाक आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे