समाजोपयोगी उपक्रम हीच खरी नागदेवते साहेबांना श्रद्धांजली प्रा.भीमराव सपकाळे
समाजोपयोगी उपक्रम हीच खरी नागदेवते साहेबांना श्रद्धांजली प्रा.भीमराव सपकाळे
जळगाव जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर ची स्थापना करताना इंजी नागदेवते साहेब यांनी जो उद्देश डोळ्यासमोर ठेवला होता त्यास अनुसरून आपण जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबविणे हीच खरी श्रद्धांजली साहेबांना ठरेल असे उद्गगार प्रा.भीमराव सपकाळे यांनी काढले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर नैशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर अर्थात “बानाई” या अभियंता संघटनेच्या जळगाव शाखेच्या संस्थापक असलेल्या माजी अधीक्षक अभियंता,सा.बां विभाग जळगाव डि टी नागदेवते यांच्या श्रद्धांजली सभेत बोलत होते.
मोहाडी रोड येथील संघटनेच्या वास्तुमध्ये घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे प्रा.भीमराव सपकाळे हे होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजी विद्याधर भालेराव यांनी केले.प्रमुख अतीथींसह सर्वांनी नागदेवते साहेबांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण केल्या यावेळी सामुहिक बुद्ध वंदना त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले.यानंतर सर्वांनी साहेबांच्या आठवणी ,अनुभव सांगितले.नागपुर येथून आलेला अधीकारी आपल्या जिल्ह्यात संघटनेची स्थापना करून एक आदर्श आपल्यापुढे ठेवतो ही गोष्ट आपणांस सदैव प्रेरणा देत राहते असे विचार जिल्हा अध्यक्ष आर जे सुरवाडे यांनी मांडले. इंजी सुशांत मेढे यांनी बानाइ च्या प्रत्येक सभासदाने कार्यशील व्हावे असा आशावाद व्यक्त केला.शेवटी सामुहीक सरणत्तंय घेण्यात येऊन इंजी मनोहर तायडे यांनी सर्वाचे आभार मानून समारोप केला



