बोलठाण ग्रामपंचायतीतर्फे माझी वसुंधरा अभियान, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मध्ये निबंध व रांगोळी स्पर्धा आज संपन्न
बागुल- नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यामधील घाटमाथ्यावरील बोलठाण ग्रामपंचायतीने माझी वसुंधरा अभियान स्पर्धेमध्ये भाग घेतला असून या अभियानांतर्गत दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी मंगळवारी निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोलठाण मधील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या पैकी रांगोळी स्पर्धेमध्ये दहावीच्या जवळ जवळ १८ते१९ विद्यार्थिनींनी भाग घेतला होता तर निबंध स्पर्धेत पस्तीस-चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता असे एकूण विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. निबंध स्पर्धेचे उद्घाटन ग्रामपंचायतीची ग्रामसेवक भगवान जाधव यांच्या हस्ते करण्यात आले तर रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन गावचे प्रथम नागरिक ग्रामपंचायतीचे सरपंच वाल्मीक गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.

रांगोळी स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बोलठाण मधील भक्ती संदीप सूर्यवंशी, शितल चव्हाण, प्रिया निकम, निकिता चाटे, काजल निकम, श्रेया व्यवहारे, पूजा पवार, दिव्या चव्हाण, सारिका वाघ, खुशी दायमा, मोक्षदा बचाटे, गौरी चव्हाण, स्नेहा थोरात, प्रिया यादव, साक्षी गायके, मानसी गायके, गौरी वाळेकर, रोज मी पटेल. इत्यादी विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल मधील इयत्ता दहावीची भक्ती संदीप सूर्यवंशी या विद्यार्थिनींनी निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे आणि काय केले पाहिजे याबाबत आईच्या दूध पिणाऱ्या बालकाच सविस्तर उदाहरण देऊन निसर्गाचे महत्त्व व माझी वसुंधरा बाबत महत्त्व पटवून दिले व माझी वसुंधरा यावर आपले भाषण केले.
ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक भगवान जाधव यांनी माझी वसुंधरा अभियानाबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल बोलठाण चे प्राचार्य चला सर यांनी देखील माझी वसुंधरा अभियानावर सविस्तर माहिती सांगितली.
या झालेल्या निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धा उद्घाटनाचे वेळी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व जुनिअर कॉलेज बोलठाण चे संस्थापक नांदगाव तालुक्याचे माजी आमदार दिवंगत कै. कन्हैयालाल महाराज यांचे सुपुत्र राजेंद्र शेठ नहार, बोलठाण ग्रामपंचायतीची सरपंच वाल्मीक गायकवाड, ग्रामसेवक भगवान जाधव, व श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री शेलार सर, बोरसे सर,नंद सर, संदेश सर, पवार सर, पाटील सर व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



