उडणाऱ्या हरणाला कधी बघितलं आहे का? राष्ट्रीय उद्यानातील Video Viral
मध्य प्रदेशमधील वन्य प्राण्यांचे अनोखे व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर प्रसिद्ध होत असतात.असाच छिंदवाडा येथील पेंच नॅशनल पार्कचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ तिथे उपस्थितीत पर्यटकांनी शूट केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एका हरणाने उंच उडी मारली आहे. तेथे उपस्थित पर्यटकांनी हे दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे. या काळात मध्यप्रदेशात हरणाची एवढी उंच उडी क्वचितच कोणी पाहिली असेल. ही उडी बघून सगळेचं हरीण उडत आहे असचं म्हणत आहेत.
And the gold medal for long & high jump goes to…….@ParveenKaswan
Forwarded as received pic.twitter.com/iY8u37KUxB— WildLense® Eco Foundation 🇮🇳 (@WildLense_India) January 15, 2022
सध्या पेंच नॅशनल पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान त्यांच्या समोरून हरणांचा कळप जात होता. पर्यटकांना पाहताच हरीण इकडे तिकडे धावू लागले. यावेळी हे हरिण तेथे एकटे पडले होते. पर्यटकांना पाहताच तो घाबरला आणि त्याने उंच उडी मारली. लोक आधीच एकट्या पडलेल्या हरणाचे व्हिडीओ बनवत होते. तेव्हाच या हरणाचा लांब उडी मारतानाचा व्हिडीओ.




