आपल खान्देश

शहीद वीर जवान अमोल पाटील यांच्यावर बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत अश्रू नयनानी अंत्यसंस्कार 

शहीद वीर जवान अमोल पाटील यांच्यावर बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत अश्रू नयनानी अंत्यसंस्कार

नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील बोलठाण येथील भूमिपुत्र अमोल पाटील यांचे सशस्त्र सीमा दलात तील जवान वय वर्षे 30 हे भारत नेपाळ बिहार मधील सुपौल मध्ये आपले कर्तव्य बजावत असताना 14 जानेवारी 2022 रोजी शुक्रवारी 11 हजार के. व्ही. विजेच्या धक्क्याने दोन जवानांसह शहीद झाले त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून त्यांच्या बोलठाण येथील राहत्या घरापासून अमोल पाटील यांची अंतयात्रा काढण्यात आली जयंती यात्रा बोलठाण येथील बाजारपेठेतून काढण्यात येऊन बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीच्या आवारातील शेडमध्ये अंत्यविधी करण्यात आला. यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते अमोल हिम्मतराव पाटील या शहीद जवानाच्या पार्थिवास श्रद्धांजली वाहण्यात आली व त्यांच्या कुटुंबियातील सर्वांनी ही श्रद्धांजली वाहिली. शिवसेनेचे नांदगाव तालुक्याचे आमदार कांदे यांनी अमोल हिम्मतराव पाटील यांच्या कुटुंबीयांना पाच लाखाची मदत जाहीर केली.

औरंगाबाद येथून शहीद वीर जवान अमोल हिम्मतराव पाटील यांचे पार्थिव रोहिले बुद्रुक येथील रस्त्यावरून जात असताना रोहिलागड येथील संपूर्ण गावातील महिला व ग्रामस्थ लहान मुलं श्रद्धांजली वाहण्यासाठी रस्त्यावर कुठे होते त्यावेळी अमोल पाटील अमर रहो घोषणा देण्यात आल्या. रोहिले बुद्रुक रस्त्यावर साफसफाई करून रांगोळी काढण्यात आली होती. रोहिले बुद्रुक येथील उपसरपंच सुनंदा बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश बागुल, सोपान गायके, कडुबाई गायके, पोलीस पाटील संतोष बागुल व इतर ग्रामस्थ रस्त्यावर श्रद्धांजली साठी उपस्थित राहून श्रद्धांजली वाहिली  

बोलठाण येथील कृषी उत्पन्न उपबाजार समिती मध्ये शहीद जवान अमोल पाटील यांच्या अंत्यसंस्काराचे वेळेस नांदगाव तालुक्याची शिवसेनेचे आमदार सुहास कांदे, काँग्रेसचे माजी आमदार अनिल दादा आहेर, आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले पूर्वीचे शिवसेनेचे माजी आमदार संजय पवार, वैजापुर तालुक्याचे आमदार रमेश बोरणार, जिल्हा परिषद सदस्य नाशिक राजाभाऊ पवार, भारतीय जनता पार्टीचे दत्तराज छाजेड, नांदगाव कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती राजाभाऊ देशमुख, बोलठाण येथील शिवसेनेचे अनिल रिंढे, रफिक पठाण, सरपंच वाल्मीक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बनकर मॅडम, तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच देविदास पवार, उपसरपंच सुनंदा मुक्ताराम बागुल, ग्रामपंचायत सदस्य सुरेश बागुल, सोपान गायकी, कडुबाई गायके, व्हिडिओ बुद्रुक ग्रामपंचायत कर्मचारी अनिल अर्बुज, बाबासाहेब अरबुज, पत्रकार मुक्ताराम बागुल, अरुण हिंगमिरे, निलेश दायमा, भरत जाधव व बोलठाण पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते. अंदाजे वीस ते पंचवीस हजार जनसमुदाय शहीद अमोल हिम्मतराव पाटील यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे