झूम मराठी वृत्तसेवा
पाचोरा तालुक्यात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी पाचोरा तालुक्यातून अनेक वेळा निवेदन, अर्ज व ग्रामपंचायत चे ठराव देण्यात आले आहे. त्यात अवैध धंदे बंदसाठी अर्ज, निवेदन व ग्रामपंचायत ठराव देऊन सुद्धा एकमात्र फायदा झालेला दिसून आलेला नाही.
एकाच गावात नाही तर पाचोरा, भडगाव तालुक्या सह अनेक ठिकाणी बऱ्याच दिवसांपासून अवैध धंदे उघड्यावर दुकान मांडून मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामध्ये सट्टा, पत्ता या अवैध धंद्याचे मार्केट मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे कायदा, शांतता, सुवेवस्था, नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे.
सट्टा घेण्यासाठी पत्ता खेळण्यासाठी गावागावात पत्राची शेड व सिमेंट ची गाळे घेऊन त्यामध्ये सट्टा त्यामध्ये अवैध धंद्याचे दुकान मांडले आहे. बऱ्याच वेळा या अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई व्हावी व अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावे यासाठी स्थानिक पोलीस स्थेशन व तालुका पोलीस अधिकारी यांना निवेदन देऊन सुद्धा हे अवैध धंदे खुलेआम चालू आहे. तर या अवैध धंदे करणाऱ्यांवर आशीर्वाद कोणाचा ? हा प्रश्न नागरिकांनी केला आहे.
गाडी येत आहे, धंदा बंद करा..
बऱ्याच वेळा गावातील सुज्ञ नागरिकांनी स्थनिक पोलिसांना अवैध धंद्याची माहिती देऊन सुद्धा पोलिसांनी केलेल्या धडसत्र मध्ये हातात गळाचा मासा लागता लागतच नाही. पोलिसांच्या वतीने धाडसत्र होणार याची पूर्व कल्पना हे अवैध धंदे करणाऱ्यांना अगोदरच माहीत होत असल्याचे निदर्शनास आल्याचे, सुज्ञ नागरिकांनी म्हटले आहे. अवैध धंदे चालू राहावे त्यात अडथळा येऊ नये म्हणून, प्रशासनात दाखल असलेल्या वेक्तीनेच आमची देवाण-घेवाण करून दिली आहे. यामुळे आमचे काहीच होऊ शकत नाही. अशा सुद्धा कॉल/व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाल्या असल्याची चर्चा मात्र जोमात आहे. त्यामुळे सट्टा किंग वर प्रशासनाचा आशीर्वाद म्हणणे वावगे ठरणार नाही.
कोविड १९ मुळे सर्वत्र सार्वजनिक ठिकाणे, शाळा, मंदिरे, कॉलेज, यात्रा, बाजार बंद आहेत परंतु सट्टा व पत्ता याचे दुकाने मात्र सर्रासपणे सुरू आहे. या सर्व अवैध धंद्याचे पूर्व कल्पना पोलिसांना नाही का? असा प्रश्न देखील नागरिकांनी केला आहे.
सध्या पाचोरा शहरात एकाच ठिकाणी ऑनलाइन सट्टा घेतला जात आहे. एकाच मिनिटात ऑनलाइन सट्टा आकडे येत असतात.आँनलाइन सट्यामध्ये वरुनच सेंटिग करता येवू शकते हे नाकारता येणार नाही! या गेममुळे अनेक तरुण काही मिनिटातच हजारो रुपये, पैसे हरल्याने गुन्हेगारी कडे वळत आहे. त्यांनतर चोरी करणे, दमदाटी करून पैसे हिसकवणे,मोबाइल हिसकावणे नाहीतर आत्महत्या करणे हे प्रकार देखील वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे सुज्ञ नागरिकांनी म्हटले आहे.
पाचोरा भडगाव तालुक्यातील अवैध धंदे दुकान मांडून चालू आहे. या सर्व रॅकेट चा पर्दाफाश लवकरच करणार, यात कोण कसे पैशे घेतात.
याची सर्व माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव, व नाशिक पोलीस आयुक्त यांना पुरव्यासाहित किमान वेगवेगळ्या ठिकाणचे ( १०० व्हिडीओ व कॉल रेकॉर्डिंग) देणार असल्याचे एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर झूम मराठी न्युज ला दिले आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा