रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेत आठ जानेवारी रोजी होणार पालक सभा
रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेत आठ जानेवारी रोजी होणार पालक सभा
नांदगाव(प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील बोलठाण पासून पाच किलोमीटर अंतरावरील रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठ जानेवारी 2022 रोजी शनिवारी सकाळी ठीक नऊ वाजता पालक सभा आयोजित करण्यात येणार असून या सभेसाठी सर्व पालकांनी उपस्थित राहावे असे आवाहन रोहिले बुद्रुक प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यवंशी व ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनंदा बागुल यांनी केले आहे
या पालक सभेमध्ये कोरोना काळात शालेय कामकाजाचे नियोजन करणे बाबत, शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्घटन करणेबाबत, विद्यार्थ्यांच्या विविध लाभाच्या योजना बाबत इत्यादी विषयावर चर्चा करण्यात येणार.इत्यादी विषयावर चर्चा करू देणार आहे आशी माहिती रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर, रोहिले बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच ठकुबाई देविदास पवार, आणि उपसरपंच सौ संगीता मुक्ताराम बागुल यांनी माहिती दिली आहे.



