आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

सावित्रीबाई फुले स्थापित पहीली मुलींची शाळा म्हणजेच भिडे वाडा, पुणे याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करा- शुभांगीताई पाटील

सावित्रीबाई फुले स्थापित पहीली मुलींची शाळा म्हणजेच भिडे वाडा, पुणे याला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषीत करा- शुभांगीताई पाटील यांची राज्य शासनाकडे मागणी

धुळे (प्रतिनिधी) पुणे येथील भिडे वाडा येथे सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहीली शाळा सुरू केली होती. सदरची वास्तु ही सद्यस्थितीत अत्यंत मोकडळीस आली असून तीची दयनिय अवस्था झालेली आहे. या वास्तुत सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले यांनी स्त्रीयांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली होती. त्या वास्तुची अशा प्रकारे दुरावस्था होणे ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी खेदाची बाब आहे.

वास्तविक पाहता या इमारतीमध्ये सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतीराव फुले या महान विभुतींच्या त्यागाचे कार्याचे व आठवणींचे प्रतीक म्हणून एक उत्तम प्रकारे वास्तु संग्रहालय निर्माण करणे शासनाकडून अपेक्षीत होते. परंतु असे न होता सदर वास्तु आज पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असताना देखील तीची अत्यंत दयनिय अवस्था झालेली असुन पुणे महानगरपालीका, पुणे शहर प्रशासन तसेच राज्य शासनाकडुन देखील सदर शाळा दुर्लक्षीत करण्यात आलेली आहे. सावित्रीबाई फुले स्थापित पहीली मुलींची शाळा असलेली सदरची भिडेवाडयाची इमारत ही १०० वर्षापेक्षाही जास्त जुनी असुन ब्रिटीश कालीन वास्तु असल्याने सदर वास्तुला शासनाने हेरिटेज घोषीत करून ती शासनाच्या ताब्यात घेवून त्याठिकाणी सावित्रीबाई फुले स्थापित पहीली मुलींची शाळा म्हणुन त्या ठिकाणी वास्तु संग्रहालय व राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे अशी मागणी आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र टिचर्स असोसिएशनच्या राज्याध्यक्षा शुभांगीताई पाटील यांनी राज्य शासनाकडे मा. मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Zoom Team

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे