आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

सरकारी योजना अंतर्गत पाचोरा शहरातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णानां सुविधा उपलब्ध..

गरीब कुटुंबांना सरकारी आणि अधिकृत खाजगी रुग्णालयात कॅशलेस उपचार घेता येणार आहेत.

झूम मराठी जाहिरात

आयुष्यमान भारत व राज्य शासनाच्या योजने अतर्गत पाचोरा तालुक्यातील गरीब रुग्णांना वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस उपचार घेता येणार आहेत. सरकारने या  रुग्णालयाला उपचारासाठी अधिकृत केले आहे. आरोग्या विषयी जनहितार्थ सुविधा सुरू केल्या असतानाच आता पाचोऱ्यातील वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सुविधा उपलब्ध झाली आहे.

कॅशलेस उपचार देणाऱ्या वृंदावन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ने रुग्णांची आरोग्य सेवा करीत यशाचे शिखर गाठत एक वर्षात तब्बल 50 खाजगी कंपन्यांची कॅशलेस सुवीधा देणारे पाचोरा शहरातील एकमेव वृंदावन मल्टीस्पेशलटी हॉस्पीटल घोषीत झाले.


वृंदावन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ निळकंठ पाटील यांनी गोरगरीब जनतेला कोणत्याही आजाराच्या उपचारार्थ पैशांअभावी उपचारासाठी वंचित राहू नये यासाठी आता रुग्णांना काळजी करण्याची आवश्यकता भासणार नाही यासाठी विविध कंपन्यांच्या पॉलिसी माध्यमातून कॅशलेस उपचार सुरू केले आहे. त्याची वृंदावन हॉस्पिटल ला मान्यता  मिळाल्याची माहिती डॉ निळकंठ पाटील यांनी दिली. यामुळे आता ह्या हॉस्पिटल मध्ये कोणत्याही रुग्णाला पैशाअभावी उपचार थांबणार नसून सर्वच आजारांवर कॅशलेस उपचार केले जातील असेही डॉ, निळकंठ पाटील यांनी माध्यमाशी बोलतांना सांगितले आहेत.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे