अजित पवारांचे मोठे संकेत; कोरोना रूग्णसंख्या वाढल्यास कठोर निर्णय घेणार
झूम मराठी वृत्तसेवा
जगभरात कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. जगातील बहुतांश देशांमध्ये ओमिक्रॉन वेगाने पसरला असावा, असा गंभीर इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर मुख्यमंत्र्यांना कठोर निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिला आहे.
कोरोनाची संख्या वाढत असल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मिनी लॉकडाउन आहे. आपल्याही राज्यात कोरोना रूग्णांची संख्या अशीच वाढली तर राज्य सरकारला नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल. अनेक राज्यात कोरोनाचे रूग्ण वाढत आहे. तेथे लॉकडाउनही करण्यात आलेले आहे. आपण जेवताना किंवा चहापान करताना मास्क काढतो, त्यावेळी आपण एकमेकांच्या समोर येतो, त्यावेळी कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. यासाठी लोकांनी स्वतःची आणि इतरांचीही काळजी घेणे गरजेचे आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.




