नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल-ब्राह्मणगाव येथील ग्रामपालिका कार्यालय व अंगणवाडी केंद्रात भारताच्या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम उस्फूर्तपणे साजरा करण्यात आला.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सकाळी नऊ वाजता ब्राह्मणगाव येथील ग्रामपालिका कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन ग्राम पालिकेचे सरपंच श्री किरण अहिरे, उपसरपंच रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री बापूराव खरे, ज्येष्ठ सदस्य ,श्री अरुण अहिरे, श्री रत्नाकर आहिरे, ज्येष्ठ नेते श्री यशवंत बापू अहिरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्राह्मणगाव ग्रामपालिका चे सरपंच श्री किरण अहिरे, उपसरपंच श्री बापूराव खरे, श्री यशवंत बापू अहिरे, श्री रत्नाकर आहिरे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी सरपंच किरण अहिरे उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष बापूराव खरे ज्येष्ठ नेते यशवंत बापू अहिरे ज्येष्ठ ग्रामपालिका सदस्य अरुण अहिरे, रत्नाकर आहिरे , केदाभाऊ ढेपले , कैलास नवरे, ग्राम विकास अधिकारी श्री संजय पवार, सामाजिक कार्यकर्ते सर्व श्री श्याम भाऊ माळी, कैलास मालपाणी, दत्तात्रेय खरे, समाधान शेवाळे, कैलास उर्फ गणू बापू अहिरे, नवनाथ खरे, तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते
यानंतर सकाळी दहा वाजता ब्राह्मणगाव येथील अजमीर सौंदाणे रोड येथील अंगणवाडी केंद्र सावित्रीबाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी ब्राह्मणगाव ग्रामपालिकेची उपसरपंच श्री बापूराव खरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली. उपसरपंच व रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष बापूराव खरे, जय श्रीराम पालिका सदस्य रत्नाकर आहिरे, श्री केदाभाऊ ढेपले यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर सविस्तर विचार व्यक्त केले.
यानंतर ब्राह्मणगाव गाव ग्राम पालिकेचे उपसरपंच बापूराव खरे, ज्येष्ठ ग्रामपालिका सदस्य रत्नाकर आहिरे, केदाभाऊ ढेपले, अंगणवाडी सेविका श्रीमती भारती बच्छाव, किरण बच्छाव यांच्या हस्ते लाभार्थी बालकांना पोषण आहाराचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजन अंगणवाडीसेविका श्रीमती भारती बच्छाव व मदतीस श्रीमती अहिल्या सूर्यवंशी यांनी केले.
या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ब्राह्मणगाव ग्रामपालिका ची उपसरपंच रिपब्लिकन पक्षाचे नाशिक जिल्हा उपाध्यक्ष श्री बापूराव खरे, ग्रामपालिका सदस्य रत्नाकर आहिरे , केदाभाऊ ढेपले, सामाजिक कार्यकर्ते श्री कैलास अहिरे, किरण बच्छाव, अंगणवाडी सेविका श्रीमती भारती बच्छाव, अंगणवाडी मदतनीस श्री अहिल्या सूर्यवंशी तसेच अनेक मान्यवर आणि विद्यार्थी, बालक पालक या वेळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे येथील अंगणवाडी केंद्रातील चिमुकल्या मुलींनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून कार्यक्रमाची शोभा वाढवली असल्याचे दिसून आले
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा