आपल खान्देश
मालेगाव पूर्व गटात जळगाव चोंडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मालेगाव पूर्व गटात जळगाव चोंडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी.
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील मालेगाव पूर्व गटात जळगाव चौंडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगाव पूर्व महिला अध्यक्ष सौ वर्षा पवार तसेच राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीचे शरद अंकुश चोरमले, माजी ग्रामसेविका शेजवळ मॅडम, अंजनाबाई चोरमले, तसेच काही शिक्षिका, मला पण उपस्थित होत्या.
तसेच अनिताताई गांगुर्डे, इंदुबाई ढोणे, सकु ताई गांगुर्डे, राणी चोरमले या सर्व महिला शिक्षण क्षेत्रात तसेच राजनीति मध्ये काम चोखपणे बजावत असतात यांचा सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने या महिलांचा सत्कार देखील करण्यात आला.



