आरोग्य व शिक्षण

पाचोरा शहरात आरिवु सेतू टेकनॉलॉजि ऑन व्हिल्सद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…


पाचोरा शहरातील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व भविष्याचा अचूक वेध घेणारे विविध टेक्नॉलॉजी ची माहिती व्हावी या उद्देशाने एमकेसीएल, पुणे रोटरी क्लब ऑफ धुळे क्रॉस रोड यांच्या संयुक्त विद्यमाने आरिवु सेतूदरा मार्गदर्शन करण्यात आले.

भविष्यात अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स, IOT, वर्चुअल रियालिटी, VR ओर्ग्युमेंटेड रियालिटी, AI,ऑटोमोशन मध्ये सेन्सर्स चे महत्व, स्मार्ट फार्मिंग, 3D Printing, एर्गोनॉमिक्स, सायबर सिक्युरिटी, गेमिंग सेन्सर्स, क्लिनिंग रोबोट, ऍडव्हान्स सोलर सिस्टम, जगातील सर्व भाषां मधील रोबोटिक्स आणि त्याचे महत्व अशा विविध विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. मार्गदर्शनासाठी धुळे येथून आलेले टिम समवेत, आशीर्वाद कम्प्युटर्स चे संचालक अतुल शिरसमणे, अजिंक्य कासार बाईट कम्प्युटरचे अभिजीत पाटील, हायटेक कम्प्युटरच्या सुरेखा पाटील, सिग्मा सेव्हन चे संदीप नेमाडे, रागिनी नेमाडे, एमटेक कम्प्युटरचे राजेंद्र पाटील, भावना पाटील युनिक कम्प्युटरचे स्वप्निल ठाकरे, यांनी मार्गदर्शन केले. रुपेश पाटील सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रास्तविक करताना विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरून आपले करिअर निवडावे व भवितव्य घडवावे असे मार्गदर्शन अतुल शिरसमणे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धुळे येथील टीम तसेच श्री.गो.से.हायस्कुल, पाचोरा चे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.

VR, IOT, रोबोटिक्स सारखे क्षेत्रात योग्य ज्ञान घेतल्यास करिअर मध्ये उंच भरारी घेता येईल- संजय वाघ


बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे