आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

कासार बंधूची परत एक जेनेरिक मेडिकल’ पाचोरेकरांच्या सेवेत..

दिलीप जय परदेशी

पाचोरा शहरातील जनरिक ओषधी क्षेत्रात नावाजलेले “जनओषधी” ह्या मेडिकलचे  कासार बंधू यांचे “कासार जनऔषधी मेडिकल अँड सर्जिकल हाऊस” नावाचे ओषधीसाठीचे नवीन मेडिकल रुग्णासाठी नुकतेच शहरातील नवकार प्लाझा तळ मजल्यावर नुकतेच सुरू झाले असून, सध्या तेथे ४०० प्रकारची स्वस्त व गुणवत्तापूर्ण औषधी उपलब्ध झाली आहेत. पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील, माजी नगरध्यक्ष संजय गोहील, तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विघ्नहर्ता हॉस्पिटलचे डॉ भूषण मगर, सिद्धिविनायक हॉस्पिटलचें स्वप्नील पाटील पत्रकार दिलीप परदेशी यांच्या उपस्थित उदघाटन करण्यात आले.

त्यामध्ये मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, गॅस्ट्रो आदींवरील औषधांसह प्रतिजैविके-जीवनसत्वांचाही समावेश आहे. लवकरच यात दुपटीने वाढ होणार आहे. विशेष म्हणजे ब्रँडेड औषधींच्या तुलनेत सर्वसाधारण जनऔषधी ही १५ ते २० पटींपर्यंत, तर, काही इमर्जन्सी औषधे-इंजेक्शन्स ५० ते १०० पटींपर्यंतही स्वस्त व तितकीच गुणवत्तापूर्ण आहेत, प्रत्येक जनऔषधावर त्या त्या औषधाचा (मॉलिक्यूल) उल्लेख आहे व ‘जेनेरिक ब्रँड’खालीच त्याची विक्री होते. ‘इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च’च्या (आयसीएमआर) मार्गदर्शक तत्वांनुसार प्रत्येक जनऔषधीची निर्मिती होते. त्यामुळे ब्रँडेड औषधांइतकाच जेनेरिक औषधांचा रुग्णांवर परिणाम होतो. जेनेरिक औषधांचा डोस, सुरक्षा, धोका, दुष्परिणाम किंवा ‘साइड इफेक्ट’देखील ब्रँडेड औषधांइतकाच असतो, मात्र नव्या औषधांच्या निर्मितीसाठी औषधी कंपन्यांना संशोधन-विकासावर मोठा खर्च करावा लागतो; तसेच मार्केटिंग, प्रमोशन व इतर बाबींवरही मोठा खर्च होतो. त्यामुळेच ब्रँडेड औषधी महाग, जेनेरिक औषधी स्वस्त असल्याचे शहरातील पहिल्या स्टोअरचे संचालक विशाल कासार व यज्ञेश कासार बंधू यांनी झूम मराठी मीडियाशी बोलतांना सांगितले.

पाचोरा शहरातील जानरिक ओषधी क्षेत्रात नावाजलेले “जनओषधी” ह्या मेडिकलचे  कासार बंधू हे फक्त मेडिकलच नाहीतर मोफत रुग्णवाहिक सुद्धा रुग्णांच्या सेवेत कार्यरत आहॆ संचालक विशाल कासार व यज्ञेश कासार यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहॆ.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे