कॅमेऱ्यात पकडले गेले जळगावचे कलेक्टर ! लोकांच्या नजरेआड करत होते हे काम..! त्यांचं असं आहे, बारामती कनेक्शन..!
बेघर, निराधारांना जळगावचे कलेक्टर अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली.
जळगाव -जळगावचे कलेक्टर कॅमेऱ्यात पकडले गेले…. ही हेडलाईन वाचल्यावर तुमच्या मनात चुकीचे काही येऊ देऊ नका.! हे कलेक्टरसाहेब त्यांच्या डाॅक्टर पत्नीसह भल्या पहाटे जळगावच्या रस्त्यावरुन फिरताना एका वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यात कैद झालेत. दोघेही पती पत्नी रस्त्यावर राहणाऱ्या गरिबांना कपडे आणि मिठाई देत असताना दिसत आहेत.
एकीकडे फटाक्यांची जोरदार आतषबाजी होत असताना दुसरीकडे रस्त्यावर भुकेल्यापोटी थंडीत कुडकुडणाऱ्यांकडे अनेकांचे दुर्लक्ष होत असल्याचे सर्वत्र चित्र असते. जळगावातही अशीच स्थिती असताना रस्त्यावर कशाचा तरी आडोसा घेऊन झोपण्याचा प्रयत्न करणाऱ्या बेघर, निराधारांना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली. कोणताही बडेजावपणा न करताना जिल्हाधिकारी व त्यांच्या पत्नीने अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केल्याने निराधारांचेही डोळे पाणावले व त्यांनी या दांपत्यास दोन्ही हाताने आशीर्वाद दिले.
कोणताही बडेजाव न करता सामाजिक भान जपणाऱ्या या कलेक्टरसाहेबांचे नाव आहे अभिजित राऊत. बुलढाणा येथील मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमीतून आपली बुद्धिमत्ता, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर दुसर्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अभिजीत राऊत यांनी 2012 मध्ये नेत्रदीपक यश मिळवत भारतीय प्रशासन सेवा म्हणजे आयएएस अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांनी बारामतीतील विद्या प्रतिष्ठान येथून जैवरसायन शास्त्रातून पदवी घेतल्यावर आयआयटी रुडकी येथून एम.टेक. पूर्ण केले. त्यांना उत्तम पगाराची नोकरीची संधी सहज मिळाली असती, परंतु आयएएस अधिकारी होऊन समाजातील विविध घटकांसाठी आपण मोठ्या प्रमाणावर चांगले विधायक काम करू शकतो हे लक्षात घेऊन ध्येय निश्चित केले.

बेघर, निराधारांना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली
रात्री अचानक एक दांपत्य त्यांच्यासाठी देवदूत म्हणून आले व या निराधारांना भर थंडीत मोठा आधार मिळाला. देवदूत दांपत्य म्हणजे जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी तथा जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील डॉ. अनुराधा राऊत हे दांपत्य. त्यांनी कोणालाही न सांगता गुप्तदानाच्या हिशोबाने गरजूंना मदत करण्यासाठी ते दिवाळीच्या रात्री बाहेर पडले. यादरम्यान त्यांनी रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या जवळपास ४० बेघर, निराधारांना थंडीपासून बचावासाठी शाल, आधार म्हणून खाद्यपदार्थ, बाम, औषधी, टूथपेस्ट, थंडीपासून बचाव करणारे मलम असे विविध साहित्य देऊन भर थंडीत मायेची ऊब दिली.





