आपल खान्देशआरोग्य व शिक्षण

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरूड माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा

शैक्षणिक जागृतीसाठी शिक्षकांचा पुढाकार..

भडगाव (झूम मराठी) जिल्हाभरात प्राथमिक व माध्यमिक शाळांची घंटा शनिवारी (ता. १५) वाजली असून आज शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरूड येथील बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मोठया उत्साहात प्रवेशोत्सव साजरा झाला.

भडगाव तालुक्यातील पिंपळगाव बांबरूड येथील बाबा सुंदरदास शिक्षण प्रसारक मंडळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सज्ज झाले असून,  दीर्घ सुट्टीच्या आनंदानंतर विद्यार्थी जेव्हा शाळेत प्रवेश करतील, त्यावेळी त्यांना शाळा हवीहवीशी वाटली पाहिजे. शाळा परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रेरणादायी करण्यात आला, शाळा प्रवेशोत्सवाच्या स्वागतासाठी विविध शिक्षणपूरक उपक्रम राबविण्यात आले व पहिल्या दिवशी आलेल्या विध्यार्थ्यांचे शब्द सुमनानी स्वागत करण्यात आले तसेच विध्यार्थ्यांना पुष्प गुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यावेळी शाळेतील मुख्याध्यापक  बी. जी. पाटील सर, शाळेतील शिक्षक के . एम. रायसिंग सर, वाय. बी. पाटील,  व्ही. डी. पाटील, एस. व्ही. पाटील, देशमुख सर,  एस. एम. पाटील, नन्नावरे सर, पवार सर,  पावरा सर,  वराडे सर, व महिला शिक्षिका  एल. एन. गढरी, आर. जे. अहिरे, व्ही. ए. पाटील,  शारदा मॅडम,  कविता पाटील मॅडम, शीतल गायकवाड मॅडम, आदी शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे