आपल खान्देशमहाराष्ट्र

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचे व योजनांचे नुकसान करणारे धुळे व नंदुरबार सह इतर जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारीच- ज्ञानेश्वर  परदेशी


झूम मराठी ऑनलाईन न्यूज मीडिया 

धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळेमध्ये प्रवेशाची योजना महाराष्ट्र शासनाने तयार केले ती अतिशय प्रjभावी आणि दूरगामी परिणाम करणारी असून सदर योजना महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात सुरू झालेली, आहे परंतु आजपर्यंत धुळे व नंदुरबार सह अनेक जिल्ह्यांमध्ये सदर योजना सुरू झालेल्या नाहीत . त्याचप्रमाणे घरकुलाची सुद्धा व्यवस्थित माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे व प्रसिद्ध वृत्तपत्रात जाहिरात न देणे, यामुळे सदर योजनेपासून समाज बाधित आहे. सदर योजना आजपर्यंत धनगर समाजातील वाढी वस्त्यांवरती पोहोचलेली नाही धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचे व योजनांचे नुकसान करणारे धुळे व नंदुरबार सह इतर जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारीच असा आरोप प्रदेश सचिव धनगर समाज संघर्ष समिती ज्ञानेश्वर  परदेशी यांनी केला आहॆ.

महाराष्ट्र शासनाने 2019 साली आदिवासी बांधवांच्या योजना, सेवा सवलती आहेत त्याच प्रमाणे धनगर समाजाला सुद्धा त्या सेवा सवलतीचा लाभ घेण्यात यावा, म्हणून एकूण 22 योजनांपैकी 19 जी आर काढले होते. त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यासाठी दुग्धविकास विभाग, सामाजिक न्याय व कल्याण विभाग यांना त्यांनी तसे आदेश पारित केले होते. सदर योजना कोणत्या विभागाखाली अधिकारात येतात त्या विभागामध्ये त्यांची वाटणी करून त्या योजना राबवण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत, परंतु आमचे असे लक्षात आले की, ठराविक ठिकाणी सदर योजनांचा लाभ घेण्यात येत आहे बाकीच्या जिल्ह्यात अधिकारी लोक दुर्लक्ष करत आहेत. जसे धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी नामांकित शाळेमध्ये प्रवेशाची योजना महाराष्ट्र शासनाने तयार केले ती अतिशय प्रभावी आणि दूरगामी परिणाम करणारी असून सदर योजना महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात सुरू झालेली, आहे परंतु आजपर्यंत धुळे व नंदुरबार सह अनेक जिल्ह्यांमध्ये सदर योजना सुरू झालेल्या नाहीत. त्याचप्रमाणे घरकुलाची सुद्धा व्यवस्थित माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत न पोहोचल्यामुळे व प्रसिद्ध वृत्तपत्रात जाहिरात न देणे, यामुळे सदर योजनेपासून समाज बाधित आहे. सदर योजना आजपर्यंत धनगर समाजातील वाढी वस्त्यांवरती पोहोचलेली नाही. परिणामी याचा फायदा समाजाला होत नाही घरकुलचा विषय असेल, धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेण्याचा विषय असेल, स्वयम योजनेचा विषय असेल, मुला मुलींच्या वस्तीगृहाचा विषय असेल, असे अनेक विषय इतर मागास कल्याण विभाग यांनी प्रलंबित ठेवलेले आहेत.

आमचे असे लक्षात आलेले आहे की नामांकित इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा आज पर्यंत सुरू करण्यात आलेल्या नाहीत म्हणजे मागील चार वर्षापासून यांनी धनगर समाजाचा विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे.सदर बाब आम्ही मा. भगवान वीर साहेब प्रादेशिक उपसंचालक संचालक इतर मागास कल्याण विभाग यांच्या आम्ही निदर्शनास आणले व त्यांना निवेदन दिले आहे की सदर योजनांच्या आमच्या सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे अन्यथा आम्ही तुमच्या कार्यालयासमोर तसेच जिल्हा कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करण्यात येईल, यापूर्वी आम्ही 6 नोव्हेंबर 2022 रोजी सदर योजनेची ऑनलाईन सभा घेतली होती त्यावेळेस पद्मश्री मा. खासदार डॉक्टर विकासजी महात्मे , ज्येष्ठ समाजसेवक बापू बापूसाहेब हाटकर यांच्यासोबत समाजातील अनेक तज्ञ व समाजसेवक उपस्थित होते त्यावेळेस असे ठरले होते की, सदर योजनेच्या लाभ जास्त जास्त गरजू व भटकंती करणाऱ्यांच्या मुलांना झाला पाहिजे असा विषय झाला होता. परंतु सदर योजनेचा फायदा गरीब धनगर बांधवांना व भटक्या जमातीला न होता इतराना त्याचा फायदा होतो असे दिसून येते. ज्या ज्या शाळेमध्ये विद्यार्थी संख्या कमी असेल त्या त्या शाळेने स्पष्ट जाहिरात देऊन सदर विद्यार्थी विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण करून घ्यावा नाशिक मध्ये मालेगाव व सिन्नर येथे अतिशय चांगल्या पद्धतीने शाळा सुरू आहे, नाशिक विभागाचे सहा. आयुक्त देविदास नांदगावकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिले की काही शाळेमध्ये जागा रिक्त आहेत त्यांनी सांगितले की ज्या शाळेत जागा रिक्त आहेत त्या शाळेमध्ये मी तुमच्या विद्यार्थ्यांना लगेच प्रवेश मिळवून देईल अशी हमी दिली. तसेच जळगाव जिल्ह्यातील अतिशय चांगल्या पद्धतीने निवासी शाळा सुरू आहेत, अहिल्यानगर पूर्वीचे नाव अहमदनगर येथे सुद्धा शाळा सुरू करण्यात आलेले आहेत, अशाप्रकारे धुळे व नंदुरबार येथे सदर अधिकाऱ्यांनी त्वरित नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्रवेशाची संधी भटक्या जातीतल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य धनगर समाज संघर्ष समिती व उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघातर्फे त्यांना करण्यात आलेली आहे. प्रदेश सचिव धनगर समाज संघर्ष समिती (महाराष्ट्र राज्य)  ज्ञानेश्वर भाऊ परदेशी, उत्तर महाराष्ट्र धनगर महासंघाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष मा.सचिन भाऊ मार्कड मा. गणेश गडरी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी इशारा दिला आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे