आरोग्य व शिक्षण

बोलठाण येथील मोफत नेत्र तपासणी शिबिराचे जनसेवा मित्र मंडळाचे मनोज भाऊ रिंढे यांच्या हस्ते उद्घाटन

बोलठाण येथील मोफत नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे जनसेवा मित्र मंडळाचे मनोज भाऊ रिंढे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

 नांदगाव ( प्रतिनिधी ) मुक्ताराम बागुल – नांदगाव तालुक्यातील बोलठाण ग्रामपंचायत कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराज जण सेवा मित्र मंडळ बोलठाण व निलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने 5 डिसेंबर 2021रोजी रविवारी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यांचे आयोजन केले होते या शिबिराचे उद्घाटन बोलठाण ग्रामपंचायतीचे सरपंच वाल्मिक गायकवाड व छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ बोलठाण चे मनोज भाऊ रिंढे यांच्या हस्ते करण्यात आले.

डोळा हा एक असा अवयव आहे की, त्याद्वारे आपण सर्वांना सुट्टी जाणीव होत असते. यासाठी आपल्या डोळ्यांची योग्य ती काळजी दिसली पाहिजे असे उद्देशून मनोज रिंढे यांनी आपल्या भाषणात सांगितले.या शिबिरात निलवसंत मेडिकल फाउंडेशन व रिसर्च सेंटर अशोक यांच्या डॉक्टरांनी रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी केली.. तपासणी एकूण 131

 रुग्णांची नागरिकांची डोळ्यांची तपासणी केली. तर 56 लोकांचे डोळ्याच्या मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्यात येणार आहे. या शिबिराच्या वेळी मनोज रिंढे, सुभाष गंडे, संजय पाटील, प्रल्हाद रिंढे, योगेश काकडे, कैलास रिंढे, बोलठाण ग्रामपंचायतीचे आपणच वाल्मीक गायकवाड ग्रामसेवक भगवान जाधव प्रतीक पठाण, आणि काय असतं व गावातील पदाधिकारी कार्यकर्ते, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे