गोपाल कंकर यांचा राज्यस्तरीय जननायक लोकगौरव पुरसकराने गौरव
पोहरी येथील गोपाल प्रभाकर कंकर यांना मनुष्यबळ विकास लोकसेवा ॲकाडमी तर्फे महाराष्ट्र राज्यातुन राज्यस्तरीय जननायक लोकगौरव पुरस्काराने २० डिसेंबर रोजी गौरविण्यात आले,परंतु हा पुरस्कार त्यांचे गुरुपुत्र आदरणीय चंद्रकांत दादा मोरे यांच्या हस्ते त्यांनी २९ डिसेंबर रोजी स्विकारला.
कोरोना काळात व गेल्या सात वर्षापासुन ते दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातुन बालसंस्कार, जनजागृती अभियान,मराठी संस्कृती मराठी अस्मिता,अन्नदान अशा विविध प्रकारच्या सेवा रुजु करत असतात, कोरोना काळामध्ये त्यांच्या ह्याच कार्याबद्दल त्यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार परिषद व पत्रलेखक संघाच्या वतिने राज्यस्तरीय कोविड योध्दा म्हणुन मानपत्र देण्यात आले होते.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा