आपल खान्देश

पाचोरा व भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची खरीप हंगामाच्या पिक विम्याची रक्कम खात्यावर जमा खा.उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्याला यश


पाचोरा व भडगाव तालुक्यातील पिक विमा योजना खरीप हंगाम २०२१ अंतर्गत पात्र विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम पाचोरा तालुक्यातील ६८८ शेतकऱ्यांसाठी ८०७४९६५ रुपये व भडगाव तालुक्यातील ८३ शेतकऱ्यांना ४५३३३३ रुपये अशी एकूण ८५२८२९८ रुपये जमा झाली असून शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. खा.उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वात अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केलेला सततचा पाठपुरावा व प्रयत्नांना प्रत्यक्षात यश आले असून त्यासंदर्भात दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी म. जिल्हाधिकाऱ्यांसह,जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव व प्रांताधिकारी पाचोरा आणि तहसीलदार पाचोरा यांच्याकडे अमोल शिंदे यांनी पत्राद्वारे मागणी लावून धरली होती.त्या अनुषंगाने सदर रक्कम जमा झालेले असून पिकांचे खरीप हंगामात सुरुवातीला पडलेल्या पावसाचा खंड व नंतर झालेल्या अति मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी बांधव पूर्णपणे हवालदिल झाले होते.अशा कठीण काळात शेतकऱ्यांना या सरकारने वार्‍यावर सोडले त्यांना दिवाळीआधी खात्यावर दुष्काळी मदत जाहीर करायचे घोषित करून दिवाळीनंतर तुटपुंज्या पद्धतीची मदत करत त्यांची दिवाळी काळी करून शेतकऱ्यांची थट्टा केली.असल्याचे अमोल शिंदे यांनी सांगितले.
तसेच सदर नुकसानीची भरपाई रक्कम स्थानिक नैसर्गिक आपत्ती व प्रतिकूल हवामान परिस्थिती (MID SEASON ADVERSITY) या दोन प्रकारे कापूस,उडीद,मूग,सोयाबीन यासाठी मंजूर करून देण्यात आलेली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले,सदर नुकसानभरपाईची रक्कम मिळवून दिल्याबद्दल पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खा.उन्मेष पाटील व अमोल शिंदे यांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे