हिरापुर जवळ अपघात, पाच जण जागीच ठार?
कोरोना चे लॉकडॉऊन उघडुन सहा महिनेहुन होवुन संपुर्ण भारत उघडला मात्र रेल्वे प्रशासनाने जादा भाडे आकारणी करुन त्यात गाड्या विषेश केल्या आहेत त्यात अपडाउन व सामान्य तिकीट बंद ठेवले आहे. जर रेल्वे प्रशासनाने पुर्ववत सेवा सुरू ठेवली असती तर पाचोरा तालुक्यातील कामगारांना जीव गमवावा लागला नसता अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दिली
पाचोरा (प्रतिनिधी) पाचोरा तालुक्यातील डोंगरगाव येथील क्रूझर गाडीला चाळीसगाव जवळील हिरापुरजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.
डोंगरगाव येथील १४ प्रवासी मजूर क्रूझर गाडीत नांदगावकडे जात होते. चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील भावसार पेट्रोल पंपाजवळ चारचाकी रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात ५ जण जागीच ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. सर्व प्रवासी नांदगाव येथील असल्याची माहिती आ.मंगेश चव्हाण यांनी दिली असून त्यांनी अपघातस्थळी पोहचत मदतकार्य सुरू केले आहे.
क्रूझरमध्ये मनमाड येथील एफसीआय गोडाऊनला हमाली कामासाठी जाणारे मजूर होते. क्रूझर गाडी पलटी झाल्याने अपघात घडला असून पाचोरा तालुक्यातील नांदगाव येथील बहुतांश मजूर तडवी बांधव असल्याची प्राथमिक माहिती आहे.



