महाराष्ट्र

एसटीचे चाक हलले; 36 गाड्या धावल्या, 1532 कर्मचारी कामावर परतल्याचा दावा, एसटी महामंडळाने केला!

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जळगाव बसस्थानकातून धुळ्याला जाणारी शिवशाही बस शुक्रवारी पोलिस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आली

एसटीचे चाक हलले; 36 गाड्या धावल्या, 1532 कर्मचारी कामावर परतल्याचा दावा, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने यांची माहिती


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जळगाव बसस्थानकातून धुळ्याला जाणारी शिवशाही बस शुक्रवारी पोलिस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जळगाव बसस्थानकातून धुळ्याला जाणारी शिवशाही बस शुक्रवारी पोलिस बंदोबस्तामध्ये रवाना करण्यात आली.

विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून रुतलेले एसटीचे चाक अखेर शुक्रवारी काहीसे हलले. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने शुक्रवारी म्हणाले, एसटी संप मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्यास सुरुवात केली. त्यानुसार आतापर्यंत १ हजार ५३२ कर्मचारी कामावर परतले.

शुक्रवारी राज्यातील विविध आगारांतून ३६ गाड्या धावल्या. त्यात मुंबई-सातारा, दादर-पुणे, स्वारगेट-ठाणे, नाशिक-पुणे, नाशिक-धुळे आदी फेऱ्यांचा समावेश आहे. संपामुळे महामंडळाचे सुमारे १२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचाही दावा चन्ने यांनी केला. ते म्हणाले, कामावर येऊ पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांची कुठेही अडवणूक होता कामा नये यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. एसटीचे कर्मचारी कामावर परतावे यासाठी सरकारने आवाहन केले आहे. जे कामावर येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. अनेक कर्मचारी डेपो सुरू करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे लवकरच एसटीची वाहतूक सुरू होईल. संप सुरू न ठेवता सर्वांनी रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

 सरकार मंत्री परब म्हणाले, महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी मुंबई हायकोर्टाच्या समितीसमोर आपले म्हणणे मांडावे. हा विषय न्यायालयामार्फत सोडवला जाईल

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे