आपल खान्देश

विदारक सत्य! जिवंतपणी बेड्स मिळेना अन् मृत्यूनंतर…

संतोष दगडे

कल्याण: कल्याण-डोंबिवली शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णाची संख्या वाढत असताना त्या रुग्णांना बेड, इजेक्शन, प्लाझ्मा वेळेवर न मिळाल्याने रुग्णाच्या नातेवाईकांची चिंता वाढली आहे. आता मृत्यू नंतर ही स्मशान भुमीत मयत रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तीन-तीन तास थांबून रहावे लागत आहे. त्यामुळे आता तरी पालिका माणुसकी दाखवणार का असा सवाल केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व मधील जाणिव सामाजिक संस्थेचे पदाधिकारी संजय विठोबा भापकर यांच्या 60 वर्षीय मातोश्री यांना कोरोनाची लागण झाली होती. शनिवार 24 एप्रिल रोजी  खाजगी रुग्णालयात ऑक्सिजन  अभावी रात्री साडेबारा वाजता त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयमधील प्रोसिजर पूर्ण केल्यानंतर कल्याण पूर्व मधील  विठ्ठल वाडी स्मशान भूमी मध्ये रात्री 2 वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला.

मात्र तेथील कर्मचारी कार्यालयास टाळे मारून निघून गेले होते. संजय भापकर समवेत त्याच्या नातेवाईकांनी तेथे बोर्डवर लिहलेल्या नंबर वर संपर्क साधला मात्र कोणीही फोन उचलत नव्हते. पहाटे  चारच्या सुमारास गॅस दाहिनीच्या ऑपरटेरने फोन उचलला. त्यांनी सांगितले की, सकाळ पासून सात मृतदेहांचे दहन केल्याने मशिन खूप गरम आहे. आता मृतदेह मशिममध्ये ठेवला तर, मशीन खराब होण्याची दाट शक्यता आहे.

तुम्ही लाकडावर दहन करा. अन्यथा सात वाजेपर्यंत मी येतोय तोवर थांबा असा सल्ला संजय भापकर आणि त्यांच्या नातेवाईकांना देण्यात आला. अखेर ते साडेपाचच्या सुमारास स्मशान भूमीत आले. व्यक्तीच्या मृत्यूचे दु:ख आणि अंत्यसंस्काराला लागणारा विलंब या सर्वाचा कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागतोय.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे