ब्रेकिंग

Viral Video : जिल्हा रुग्णालयात गोंधळ; नर्सनं लगावली डॉक्टरच्या कानशिलात

झूम मराठी न्यूज वेब मीडिया

Dileep Pardeshi @ zoommarathimedia #27April 21

दररोजच्या वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण संख्येमुळे देशात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोना रुग्णांचा मृत्यू तर होतच आहेत. यातच भर म्हणून दिवसरात्र काम करणारे डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफ अतिरिक्त कामामुळे तणावात आहेत. त्यांच्यातील तणाव स्पष्ट दिसत आहे. कामाच्या ठिकाणाचा तणाव त्यांच्या चेहऱ्यावर एकदम स्पष्टपणे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशमधील एक धक्कादायक घटना घडली आहे. रामपूरमधील एका रुग्णालयात डॉक्टर आणि नर्स यांच्यात वाद झाल्याचा प्रकार व्हिडिओत कैद झाला आहे.

उत्तर प्रदेश मधील रामपूर (Rampur) जिल्हा रुग्णालयात स्वाक्षरीवरुन नर्स आणि डॉक्टरमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. शाब्दिक चकमक सुरु असतानाच नर्सचं संतुलन बिघडलं अन् डॉक्टरांवर हातही उचलला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पहा व्हिडीओ 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे