राजकीय
अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?; नितेश राणे यांचे खोचक ट्विट
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. काल रात्री 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक ट्विट केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?”, असं ट्विट आमदार नितेश राणे यांनी केलं आहे.
Anil deshmukh.. Happy Diwali!
Anil Parab..Merry Christmas??
Special thanks to nawab malik n Sanjay raut 😅
— nitesh rane (@NiteshNRane) November 1, 2021

“अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं. काल 1 नोव्हेंबरला सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ ट्विट करत ईडीच्या कारवाईला सहकार्य करणार असल्याचं म्हटले आहे.








