महाराष्ट्र

गुटखा विकण्यावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये, दोन गुटका विक्रेत्यांनी एका फेरीवाल्यावर धारदार शस्त्रने हल्ला

गुटखा विकण्याच्या वादावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये दोन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

हल्लेखोर दोन फेरीवाल्यांना कल्याण आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे.

कल्याण: गुटखा विकण्याच्या वादावरून धावत्या एक्सप्रेसमध्ये दोन फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हाणामारीत एका फेरीवल्याने दुसऱ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याने हा फेरीवाला जखमी झाला आहे. याप्रकरणी कल्याण आरपीएफ पोलिसांनी एकाला अटक केली आहे. मात्र, फेरीवाले सर्रासपणे गुटखा विकत असताना आरपीएफ पोलीस करतात काय? असा सवाल केला जात आहे.

ट्रेनमध्ये सर्रासपणे फेरीवाले धंदा करतात. फेरीवाले फिरून गुटखा विकत आहेत. आरपीएफ करते काय? या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत

चालत्या ट्रेनमध्ये गुटखा विकण्याच्या वादातून फेरीवाल्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दोन गुटका विक्रेत्यांनी एका फेरीवाल्यावर धारदार शस्त्रने हल्ला केला. यात पवन गुप्ता नावाचा फेरीवाला जखमी झाला आहे.. तर हल्लेखोर दोन फेरीवाल्यांना कल्याण आरपीएफ पोलिसांनी अटक केली आहे. ट्रेनमध्ये सर्रासपणे फेरीवाले धंदा करतात. फेरीवाले फिरून गुटखा विकत आहेत. आरपीएफ करते काय? या घटनेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सध्या ट्रेनमध्ये लस घेतल्याशिवाय प्रवास करु शकत नाही. अशा परिस्थितीत सर्रासपणे गुटखा विक्रेत्यांना कसा काय प्रवेश मिळतो. फेरीवाले धारदार शस्त्रे घेऊन फिरतात. एकमेकांवर जीवघेणा हल्ला करतात. याचा त्रास प्रवाशांना होतो. याची जबाबदारी आरपीएफची आहे. ट्रेनमध्ये फेरीवाले आरपीएफच्या मिलीभगत शिवाय जाऊ शकत नाही. या प्रकरणाचा रितसर तपास झाला पाहिजे. दोषींच्या विारेधात कारवाई झाली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे