गुन्हेगारी

दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई ; तब्बल १६२ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत!

संगमेश्वर :- महाराष्ट्रातील कोकण भागात गावठी बॉम्ब आढळल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे मध्य प्रदेशातील एका व्यक्तीला जिल्हाद हशतवाद विरोधी पथक आणि बॉम्ब नाशक पथकाने जेरबंद केलं आहे. या व्यक्तीकडून तब्बल १६२ जिवंत गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत.

जिल्ह्यात मागील दीड महिन्यात गावठी बॉम्ब मोठ्या प्रमाणात सापडल्याची ही तिसरी घटना उघड झाली आहे. यापूर्वी मंडणगड तालुक्यात १९ गावठी बॉम्ब शिकारीसाठी पेरण्यात आले होते. तसंच संगमेश्वर तालुक्यातील देवरूख नजीकच्या हरपुडे मराठवाडी येथील एका इसमाकडून पोलिसांनी १८ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले होते. जिल्हा दहशतवाद विरोधी पथक व बॉम्ब नाशक पथकाला संगमेश्वर तालुक्यातील शिवधामापूर येथे गावठी बॉम्ब घेऊन एक व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. गुरुवारी दहशतवाद विरोधी पथकाने तातडीने या भागात सापळा रचला होता. शिवधामापूर गावच्या हद्दीत जंगल परिसरात असणाऱ्या एका बंद घराशेजारी संशयित व्यक्ती आल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पथकातील कर्मचाऱ्यांनी या व्यक्तीला ताब्यात घेतले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे