अजित पवार यांच्या निकटवर्तीयांची १८४ कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई : प्राप्तिकर विभागाने अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर मारलेल्या छाप्यात १८४ कोटी रुपयाची बेहिशोबी मालमत्ता जप्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे
प्राप्तिकर विभागाच्या सीबीडीटी विभागाने ही माहिती दिली आहे. मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील ७० ठिकाणी धाडी टाकल्या. या छापेमारीत बेहिशोबी मालमत्ता आणि काळा पैसा जप्त करण्यात आल्याचं म्हटलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही सीबीडीटीच्या प्रेस रिलीजच्या आधारे अजित पवारांच्या संबंधितांचे १८४ कोटी रुपये जप्त केल्याचा दावा केला आहे
या दोन्ही समूहाकडे १८४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अनेक महत्त्वाची कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आले आहेत. ज्या दिवशी पवार यांच्या बहिणीच्या घरी छापेमारी करण्यात आली होती, त्या वेळी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. कोल्हापूर आणि पुण्यात अजितदादांच्या दोन बहिणी राहतात. या छापेमारीत २.१३ बेहिशोबी मालमत्ता आणि ४.३२ कोटी रुपयांची ज्वेलरी जप्त करण्यात आली आहे. बनवावट शेअर प्रीमियम, संदिग्ध असुरक्षित कर्ज, काही माध्यमातून मिळवलेला निधी आदी विविध मार्गाने ही रक्कम जमा करण्यात आल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत असल्याचा दावा सीबीडीटीने केला आहे.



