महाराष्ट्र

घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी

घोडबंदर मार्गाच्या दुरुस्तीची खासदार राजन विचारे यांच्याकडून पाहणी करताना

 

शरण खन्ना ठाणे जिल्हा प्रतिनिधी 

ठाणे मागील काही दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे घोडबंदर परिसरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाल्याने गेले 5-6 दिवस या परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे, त्याचा फटका शहरातील नागरिकांना बसत आहे, शहरातून घोडबंदर येथे जाण्यासाठी एक ते दीड तास प्रवास नागरिकांना करावा लागत होता. खासदार राजन विचारे यांनी या होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठाणे महापालिका आयुक्त, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच पोलीस आयुक्त व वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त त्यांच्याशी सतत संपर्क साधून वाहतूक शाखेच्या मदतीने आज विश्रांती घेतलेल्या पावसामुळे चेना ब्रिज पासून खड्डे बुजवण्याच्या सुरू झालेल्या कामाची पाहणी केली. खासदार राजन विचारे यांनी यावेळी संवाद साधताना चेना ब्रीज ते कापूरबावडी या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरू असून , येत्या ३ दिवसांमध्ये ते पूर्ण करणार आहे अशी माहिती दिली.

तसेच या मार्गावर जड अवजड वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून रात्री ११:०० ते सकाळी ५:०० वाजेपर्यंत जड वाहने काढण्याच्या अधिसूचना देण्याची विनंती केली होती. त्याची आजपासून सुरुवात करण्यात आल्याची माहिती खासदार राजन विचारे यांनी आज दिली. या पाहणी दौऱ्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता कांबळे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विनय राठोड, पोलीस निरीक्षक परदेसी, नगरसेवक नरेश मनेरा, सिद्धार्थ ओवळेकर आदि उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे