आपल खान्देश

पाचोरा रेल्वे स्टेशनला महाप्रबंधकांचा दौरा- भाजपाच्या अमोल शिंदे यांचे प्रवाश्यांच्या समस्यांबाबत निवेदन

पाचोरा-  दि.२२ सप्टेंबर  सेंट्रल रेल्वे चे महाप्रबंधक मा.अनिलकुमारजी लाहोटी यांच्या दौऱ्या दरम्यान पाचोरा रेल्वे स्टेशनवर भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली.याप्रसंगी मागील काळांत पाचोरा स्टेशनवर भारतीय जनता पार्टी ने केलेल्या रंगरंगोटी व सौंदर्यीकरणाचे त्यांनी कौतुक करत आभार देखील व्यक्त केले.यावेळी महाप्रबंधक मा.अनिलकुमारजी लाहोटी यांना खालील मागण्यांचे निवेदन दिले.

१) पाचोरा येथील नागरिक मोठया प्रमाणांत जळगाव,चाळीसगाव, नांदगाव,मनमाड येथे नोकरी व व्यवसाय निमित्त अप-डाऊन करत असुन पॅसेंजर गाडी बंद असल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.त्यासाठी लवकरात लवकर पेसेंजर/मेमु गाडी सुरू करून त्यांना मासिक पास मिळावा.

२) पाचोरा रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ६.३० वा. नंतर नाशिक व मुंबई जाण्यासाठी कुठल्याही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं.०२१०६

 विदर्भ एक्सप्रेस व गाडी नं.०२८१० हावडा-मुंबई मेल ह्या गाड्यांना थांबा मिळावा.

३) तसेच पाचोरा येथून सुरत, बडोदा,अहमदाबाद येथे जाण्यासाठी एकही गाडीला थांबा नसल्याने गाडी नं. ०६५०१ अहमदाबाद-बेंगलोर (सोलापूर मार्गे) या गाडीला पाचोरा येथे थांबा मिळावा.अश्या मागणीचे निवेदन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे