गेल्या दोनचार दिवसांपासून सोशल मिडीयावर एक Video व्हायरल होत आहे ज्यात व्हिडीओमध्ये फुलांचा हार घातलेला माणसाला एक पत्रकार घराच्या पाठीमागे नेवून शिविदेत कानशिलात देतो. अनेक नेटकरी हा Video खरा समजून पुढे पाठवीत आहे. या व्हायरल Video बद्दल आम्ही तुम्हाला माहिती देत आहो.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये फुलांचा हार घातलेला माणूस आणि हातात माईक धरून असलेला पत्रकार यांच्या आजूबाजूला काही लोक उभे राहतानाही दिसतात. पत्रकार त्या उमेदवाराला प्रचाराबाबत प्रश्न विचारतो सोबतच कोरोना विषयी पण बोलतो यावर उमेदवार कोरोना नाही अस सांगतो त्यांतर ,पत्रकार त्या उमेदवाराला फोटोशूटच्या बहाण्याने घराच्या मागे घेऊन जातो आणि त्याला शिविदेत जोरदार थप्पड मारतो.
व्हिडिओ शेअर करताना दावा केला जात आहे की एका पत्रकाराने फोटो काढण्याच्या बहाण्याने गावच्या सरपंच पदाच्या उमेदवाराला थप्पड मारली. फेसबुक वापरकर्त्याचा व्हिडिओ “उमेदवारासोबत असा फोटो सूट कोण करतो भाऊ”. हा व्हिडीओ सत्यापित फेसबुक अकाऊंटवरूनही पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओच्या मथळ्यामध्ये लिहिले आहे, “जर तुम्ही पत्रकार असाल तर आज नेता जी उद्या अंध भक्तांची नंबर असणार.
व्हायरल व्हिडिओसह केलेला दावा दिशाभूल करणारा आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे लोक पत्रकार किंवा निवडणूक उमेदवार नसून कलाकार आहेत. हा व्हिडिओ फक्त बिहारमध्ये होणाऱ्या पंचायत निवडणुका लक्षात घेऊन मनोरंजनासाठी बनवण्यात आला आहे.
हा व्हिडिओ हर्ष राजपूत नावाच्या यूट्यूब चॅनेलवर सापडला. हा व्हिडिओ 9 सप्टेंबर 2021 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर देण्यात आला आहे, ज्यात लिहिले आहे, “हा व्हिडिओ स्क्रिप्ट केलेला आहे आणि मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे.” व्हिडीओमध्ये वापरल्या जाणार्या अपमानास्पद भाषेमुळे दर्शकांना हेडफोन घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या व्हिडिओमध्ये, व्हायरल झालेला भाग हा 2 मिनिटे 30 सेकंदांनंतर आहे.
“त्याचे खरे नाव हर्ष राजपूत आहे. धर्मेंद्र हे एक पात्र आहे जे मजेदार व्हिडीओद्वारे लोकांचे मनोरंजन करते, त्यामुळे लोक त्याला धर्मेंद्र धाकड म्हणून ओळखतात. हर्ष मूळचा औरंगाबाद, बिहारचा आहे आणि तिथूनच त्याच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. तो एक युट्यूबर आहे.
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा