मृत्यूची नौका: बैल गेला आणि झोपा केला…
मृत्यूची नौका: बैल गेला आणि झोपा केला…
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून एलिफंटा आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरी बोटीने प्रवास करतात. ही तीनही पर्यटनस्थळे आहेत. मुंबईहून अलिबागला रस्त्याने जायचे म्हटले, तर सात-आठ तास लागतात. वाहतूक कोडींतून मार्ग काढीत जावे लागते. वेळ आणि पैसाही जास्त लागतो. या पार्श्वभूमीवर या तीनही पर्यटनस्थळांना जोडणारा स्वस्त, कमी वेळेचा आणि कमी त्रासाचा मार्ग म्हणून जलमार्गाकडे पाहिले जाते.
मुंबईतील ‘गेट वे ऑफ इंडिया’वरून एलिफंटा आणि अलिबागला जाण्यासाठी दररोज असंख्य प्रवासी फेरी बोटीने प्रवास करतात. ही तीनही पर्यटनस्थळे आहेत. मुंबईहून अलिबागला रस्त्याने जायचे म्हटले, तर सात-आठ तास लागतात. वाहतूक कोडींतून मार्ग काढीत जावे लागते. वेळ आणि पैसाही जास्त लागतो. या पार्श्वभूमीवर या तीनही पर्यटनस्थळांना जोडणारा स्वस्त, कमी वेळेचा आणि कमी त्रासाचा मार्ग म्हणून जलमार्गाकडे पाहिले जाते. भाऊचा धक्का आणि ‘गेट वे ऑफ इंडिया’हून एक-दीड तासात अलिबागला किंवा घारापुरीला पोचता येते.
बोटीवर क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी होते; मात्र कर्मचारी पाच ते दहाच होते. अपघातानंतर बोटीवर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. ती परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी, लाईफ जॅकेट पुरवण्यासाठी, आपत्कालीन परिस्थितीत काय करावे हे सांगण्यासाठी बोटीवर पुरेसे प्रशिक्षित मनुष्यबळ नव्हते.
त्यामुळे समुद्रमार्गे बोटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. प्रवासी बोटीवर योग्य इमर्जन्सीचे प्रोटोकॉल्स नव्हते, बोटीला धडक लागल्यानंतर प्रवाशांनी आपल्या सुरक्षेसाठी काय करावे यासंदर्भात कर्मचाऱ्यांनी कोणतेही मार्गदर्शन किंवा कोणतीही घोषणा केली नाही. यामुळे स्वत:चा जीव वाचवण्यासाठी घाबरलेले प्रवासी मिळेल ते लाईफ जॅकेट हातात पकडून ठेवत होते. यापुढे नेमके काय करायचे, तेच त्यांना समजत नव्हते. बोटीवर प्रचंड गोंधळाची परिस्थिती होती.
एका प्रवाशाने नौदलाच्या ‘स्पीड बोटी’चा चालक समुद्रात स्टंट करत होता, असा आरोप केला आहे. नौदलाची ‘स्पीड बोट’ स्टंट करत होती. आम्हाला संशय आल्याने मी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्याच्या काही क्षणांतच आमच्या फेरीला त्या बोटीने जोरदार धडक दिली”, असे एका प्रवाशाने सांगितले, ते भयंकर आहे. घटनेच्या वेळी ‘नीलकमल’ मध्ये लाईफ जॅकेटस्चा मोठा साठा उपलब्ध होता; मात्र बोट बुडू लागेपर्यंत कोणत्याही प्रवाशाने किंवा क्रू मेंबरने ते घातलेले नव्हते. या घटनेनंतर एका वरिष्ठ बंदर अधिकाऱ्याने सुरक्षेची अपुरी अंमलबजावणी आणि फेरी ऑपरेटर, नियामक प्राधिकरण यांच्याकडून दक्षतेचा अभाव असल्याची तक्रार केली आहे.
‘लाईफ जॅकेटस’ पुजायला ठेवली होती का, असा प्रश्न पडतो. सज्ज असलेली जेएनपीटी पायलट बोट वेळेवर बचावकार्यासाठी पोहोचल्याने आणखी मोठी जीवितहानी टळली. बोटींवर लाईफ जॅकेटस् ठेवणे बंधनकारक असताना आपत्कालीन परिस्थितीचा सामना केल्याशिवाय प्रवासी क्वचितच ते परिधान करतात. हा सामान्य आळस घातक ठरू शकतो. फेरींना परवाना देणाऱ्या अधिकाऱ्यांनी बोटीमधील सर्व प्रवाशांना लाईफ जॅकेटस् पुरवल्या आहेत का आणि प्रवासादरम्यान त्यांनी ते वापरलेत का, याची अधूनमधून खात्री करायला हवी. त्यात अयशस्वी ठरलेल्या फेरी ऑपरेटरना दंड ठोठावला पाहिजे. स्थानिक बोट ऑपरेटर सुभाष मोरे यांनी आरोप केला, की नौदलाच्या बोटी वारंवार धोकादायकपणे फेरी बोटीच्या अतिशय जवळून चालतात.



