ब्रेकिंग

धुळ्यात वारं फिरलं, जनतेने सुभाष भामरेंना पाडलं, काँग्रेसच्या शोभा बच्छाव विजयी..

धुळे शहरात जातीय समीकरने नेहमीच प्रभावी ठरत आली आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे सलग दोन वेळा निवडून आल्यानंतर २०मतदारसंघात रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला होता. शेतीमाल व यंत्रमागावरील प्रक्रिया उद्योगाचा अभाव तसेच धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटचाऱ्या, कालव्यांचे प्रश्‍न कायम होता. यासोबत कसमादेसाठी वरदान ठरणाऱ्या ‘मांजरपाडा – २’ प्रकल्पाची मागणी देखील यावेळी प्रचाराचा मुद्दा ठरली. कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन शेतकरी वर्गाची केंद्र सरकारवर नाराजी दिसून आली.२४ साली तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली होती. या मतदारसंघात २००९ पासून भाजपचे वर्चस्व पाहायाला मिळत आहे मात्र शोभा बच्छाव यांनी यावेळी तगडं आव्हान उभे केलं. धुळे लोकसभा मतदारसंघात यंदा ६०.६१ टक्के मतदान झालं होतं.

निवडणुकीच्या सुरुवातीला भाजपसाठी एकतर्फी वाटणाऱ्या धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र आता पूर्ण बदलले आहे. ‘एमआयएम’ने उमेदवार न देता काँग्रेसला पाठिंबा देणे, वंचितच्या उमेदवाराचा अर्ज बाद होणे, यामुळे या मतदारसंघात काँग्रेसने आव्हान निर्माण केले होते. भाजपचे डॉ. सुभाष भामरे व काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांच्यात चुरशीची लढत होती. विरोधी मतांचे विभाजन टळल्याने डॉ. भामरे विजयाची हॅटट्रिक करता, की डॉ. बच्छाव त्यांचा विजयरथ रोखतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या, अखेर धुळे लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव या ५१५५ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी दोन वेळा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री असलेले भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.

मतदारसंघात रोजगाराचा प्रश्‍न गंभीर बनला होता. शेतीमाल व यंत्रमागावरील प्रक्रिया उद्योगाचा अभाव तसेच धुळे जिल्ह्यात सिंचन प्रकल्पासंदर्भात पाटचाऱ्या, कालव्यांचे प्रश्‍न कायम होता. यासोबत कसमादेसाठी वरदान ठरणाऱ्या ‘मांजरपाडा – २’ प्रकल्पाची मागणी देखील यावेळी प्रचाराचा मुद्दा ठरली. कांदा आणि कापूस निर्यातबंदीवरुन शेतकरी वर्गाची केंद्र सरकारवर नाराजी दिसून आली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे