आपल खान्देश

कृष्णापुरी सोसायटीत सतीशबापू शिंदे यांच्या नेतृत्वात चेअरमनपदी धोंडू हटकर तर व्हा.चेअरमन म्हणून ओमप्रकाश पाटील यांची निवड

अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांना दिल्या शुभेच्छा

पाचोरा (झूम मराठी) गेल्या आठवड्यात संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णापुरी विकास सोसायटीच्या चुरशीच्या लढती नंतर आजी-माजी आमदार पुरस्कृत पॅनलला पराभूत करत भाजप पुरस्कृत पॅनलने सतीशबापु शिंदे व अमोलभाऊ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपले वर्चस्व कायम ठेवले होते.कृष्णापुरी सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन यांच्या निवडीचा कार्यक्रम आज दि.१३ एप्रिल रोजी पार पडला यावेळी नेहमीप्रमाणे पॅनल मधील इतर संचालकांना संधी देत पॅनल प्रमुख सतीशबापु शिंदे यांनी चेअरमनपदी धोंडू हटकर व व्हा.चेअरमन पदी ओमप्रकाश पाटील यांची निवड करून सहकारात नवीन आदर्श निर्माण केला आहे.तसेच या सोसायटीमध्ये गेल्या २३ वर्षांपासून सतीशबापु शिंदे यांचे निर्विवाद वर्चस्व असून, एकीकडे सहकारात संस्था डबघाईला जात असतानाच्या काळात मात्र कृष्णापुरी सोसायटी मात्र सतत २३ वर्षापासून पारदर्शक व आदर्श कामकाजामुळे ‘अ’ वर्ग मिळवत आहे.त्यामुळे कृष्णापुरी सोसायटीने संपूर्ण जिल्ह्यात एक वेगळे स्थान मिळवले आहे.

 या निवडीच्या कार्यक्रमाप्रसंगी सतीषबापू शिंदे व भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी निवडून आलेले नवनिर्वाचित संचालक दिगंबर आहिरे,शिवाजी चौधरी,हेमंत चव्हाण,शिवाजी महाजन,दिलीप नागणे,काशिनाथ पाटील,प्रकाश चौधरी,मुक्ताबाई बोरसे,सिंधुताई शिंदे,प्रेमलाल देसाई व संस्थेचे सचिव नारायण चौधरी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे