महाराष्ट्र

मानवसेवा विकास फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील म्हसकर यांच्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ग्लोबल टीचर अवॉर्ड सन्मानित आदर्श शिक्षक आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तसेच मानवसेवा विकास फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष सुनील म्हसकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बुधवार दिनांक 25 ऑगस्ट, 2021 रोजी जिल्हा परिषद शाळा,पाली येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले! यावेळी म्हसकर सर यांना जागतिक स्तरावरील ग्लोबल टीचर अवॉर्ड 2020 हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचा ग्रामस्थांतर्फे आणि मानवसेवा विकास फाउंडेशन तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला तसेच त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या! ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द कीर्तनकार ह.भ.प. गोविंद महाराज तरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात अमरावती येथील मानवसेवा विकास फाउंडेशनचे महाराष्ट्र प्रदेश संघटक मा.श्री.व्ही.एस. पाटील सर; श्री.साईश्रद्धा सेवाभावी ट्रस्ट सरवली, भिवंडी या ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष श्री. विष्णू भोईर; तसेच साने-पाली ग्रुप ग्रामपंचायतीचे प्रशासक तथा केंद्रप्रमुख आदरणीय पी.एम.शिर्के साहेब; ग्रामसेविका श्रीमती नलिनी म्हात्रे मॅडम; माजी उपसरपंच श्रीमती काजल तरणे, पोलीस पाटील श्री.साईनाथ तरणे; शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कमल जाधव, सहशिक्षिका श्रीमती दीपाली शिरसाट, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, श्री. तुकाराम तरणे, स्वामी विवेकानंद संस्थेचे सचिव संजय तरणे, अनंता तरणे, सौ. गीतांजली म्हसकर, शैलेश तरणे, जोन तरणे, महिला बचतगट प्रमुख सौ. सुनीता पाटील, आकाश म्हात्रे, ज्ञानेश्वर तरणे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुनील म्हसकर सर म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने अभ्यास करून, वाचन व लेखन यांचा सराव करून, विविध उपक्रम, स्पर्धा यांच्यात सहभागी व्हावे, विविध कलागुणांनी निपुण व्हावे आणि त्यातून आपले व्यक्तिमत्त्व बहुआयामी करावे! विद्यार्थ्यांना अभ्यासाची भूक लागली पाहिजे त्यातूनच उद्याचा सक्षम व समर्थ नागरिक घडेल.” तर कार्यक्रमाचे अध्यक्ष हभप गोविंद महाराज म्हणाले की, “विद्यार्थी हा निरागस बालक आहे, त्याला योग्य संस्कार, उचित मार्गदर्शन आणि दर्जेदार असे मनःपूर्वक शिक्षण शिक्षकांनी दिले तरच तो भविष्यात सजक, जाणता असा गावाचा पालक होणार आहे!सुनील म्हसकर सरांनी जसे गावाचे नाव जगाच्या पातळीवर नेले तसेच तुम्हीही सौजन्याने वागावे, खूप पुढे जावे!” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती विद्यालयाचे सहशिक्षक श्री.मुकेश दामोदरे सर यांनी केले तर आभारप्रदर्शन संस्थेचे सचिव श्री.संजय तरणे यांनी केले!कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मेहनत घेतली! कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करून सदर कार्यक्रमात पंचक्रोशीतील नागरिक आनंदाने सहभागी झाले होते.

 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे