आपल खान्देश
मनमाड मध्ये विजयस्तंभाची प्रतिकृती, विजयस्तंभाला गाव मानवंदना देण्यासाठी नागरिकांची रीघ
नांदगाव (प्रतिनिधी) मुक्ताराम बागुल- नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीमा कोरेगांव शौर्य दिवस मनमाड शहरात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ भीमा कोरेगाव मध्ये असलेल्या विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली. याला अभिवादन करण्यासाठी दोन समाज पार्टी, शिवसेना, आर पी आय यासह इतर राजकीय पक्षातील कार्यकर्ते माने भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. ब्रिटीशांच्या बाजूने पाचशे महारांनी लढा देऊन 28 हजार पेशव्यांना या युद्धात हरवले होते. 500 महार सैनिकांमध्ये शेर झालेल्या शहिदांच्या स्मरणार्थ ब्रिटिश सरकारकडून सरकारकडून पुणे येथे विजय स्तंभ विजय स्तंभ उभारण्यात आला होता. भीमा कोरेगाव प्रमाणे मनमाडला प्रतिकृती उभारून अभिवादन करण्यात आले




