चिमुकल्या चाणक्यचा ‘कोरोना’ पासूनच्या बचावाचा थोरामोठ्यांना संदेश
धुळे- मी श्री.सुभाष मासुळे धुळे येथिल पाडवी नूतन विद्यालयात शिक्षक असून माझ्या परीवारात माझा लहानसा नातू चाणक्य (शिव) हा आमच्या समवेत राहतो. चाणक्य विकास मासुळे हा अवघ्या १५ महिण्याचा असून या ‘कोरोना’ काळात घरातील लोकांचे येता-जाता निरीक्षण करुन तो सुध्दा मास्क आणि सॅनेटायरची मागणी करतो.नाही दिले मोठ्यामोठ्याने रडायला सुरूवात करतो.अजून त्याला बोलता येत नाही पण लहान मुले किती अनुकरणप्रिय असतात त्याचे ते ज्वलंत उदाहरण आहे.मी किंवा त्याचे वडील,काका बाहेर जात असतील तर त्यांच्या तोंडावर मास्क लावला नसेल तर तो मोठ्याने आवाज काढून त्याच्या तोंडावरून हात फिरवतो व मास्क लावायला सुचित करतो.मी शाळेत जायची तयारी करायला लागलो की,तो घरात त्याच्या दृष्टीला पडेल तो मास्क घेवून येतो. बाहेरून आल्यावर त्याला जर कोणी सांगितलं की,”बाबा आले” तो धावत पळत सॅनेटायझरची बाटली घेवून येतो व सॅनेटाईझ होण्याचा आग्रह धरतो.तसेच त्याच्या अंगावर दिवसात एक-दोन वेळा तरी डेटॉलच्या पाण्याची फवारणी करायला लावतो. कित्येक वेळेस तो त्याचा मास्क लावून, सॅनेटायझरची बाटली घेवून घरात फवारणी करतो.
मास्क, सॅनेटायझर आणि शिस्तीचे महत्व चिमुकल्या चाणक्यला समजलं पण वयाने मोठ्या झालेल्या कित्येक लोकांना अजूनही समजत नाही,लोकांना पुन्हा-पुन्हा सांगावं लागतं की,बाहेर जातांना मास्क वापरा,बाहेरून आल्यावर सॅनिटाइज व्हा.येता-जाता हातपाय धुवा,गर्दीत जावू नका,इतरांपासून सुरक्षित अंतर ठेवा. हे चिमुकल्यांना समजायला लागलं पण थोरामोठ्यांना समजत नाही हेच आमचं दुर्दैव म्हणावं लागेल.
आपलाच-श्री.सुभाष मासुळे,
पाडवी नूतन विद्यालय धुळे
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा