महाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात मृत वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबाला 15 लाखांची मदत, पतीला नोकरी

मुख्यमंत्र्यांकडून ढुमणे कुटुंबीयांचे सांत्वन

मुंबई, (विशेष प्रतिनिधी उदय नरे) – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या वनरक्षक स्वाती ढुमणे यांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांत्वन केले. मृत श्रीमती ढुमणे यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतानाच, त्यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे तसेच त्यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत  घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.

स्वाती ढुमणे व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेल्या होत्या. सकाळच्या सुमारास त्या ताडोबाच्या कोलारा वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 97 येथे पोहोचल्या त्यावेळी वाघाने हल्ला केला. स्वाती ढुमणे यांच्या सोबत 4 वनमजूर सुद्धा होते. त्यांनी वाघाला हुसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने स्वाती यांना ओढून दाट जंगलात नेले होते त्यात ते ठार झाले

ताडोबा-अंधारी प्रकल्पातील व्याघ्र गणनेची तयारी करण्यासाठी वनरक्षक श्रीमती ढुमणे कर्तव्यावर असताना, वाघाने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी प्रकाराबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी मृत ढुमणे आणि त्यांच्या कुटुंबियाप्रति संवेदना प्रकट केली आहे.  वन विभागाच्या तरतुदीनुसार संबंधित निधीतून ढुमणे यांच्या कुटुंबियांना 15 लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. तसेच श्रीमती ढुमणे यांच्या पतीला वन विभागाच्या सेवेत सामावून घेण्याचेही निर्देशित केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Dileep Jay Pardeshi

निपक्ष, वास्तविक, सत्य आणि विश्वसनीय लोक-माध्यम 'झूम मराठी' सामान्य जनतेचा आवाज डिजिटल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आमच्या टीमच्यावतीने करण्यात येतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे