पुण्यश्लोक अहिल्यामाईंचे चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवणे हेच उद्दिष्टे ठेऊन पुस्तिका प्रकाशित- डॉ वर्षा चौरे
देश भरात पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यामाई यांच्या त्रिशताब्दी जयंती मोठया उत्साहात साजरी होणार असून त्या निमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या तीन पुस्तिका प्रकाशित झाल्या असून प्रत्येक नागरिकां पर्यत पुस्तिका पोहचवीने घरजेचे आहे.
पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यामाई यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील या तीन पुस्तिका प्रकाशित होत आहेत. शालेय अभ्यासक्रमात इतिहासाच्या कोणत्याही पुस्तकात अहिल्यामाईंबाबत एकही पाठ आपल्याला दिसत नाही. त्यामुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत थोडक्यात अहिल्यामाईंचे चरित्र सर्वांपर्यंत पोहोचवणे हाच या लहान पुस्तिका प्रकाशित करण्यामागचा उद्देश आहे. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त मुलांपर्यंत लोकमाता अहिल्यामाई यांचे चरित्र पोहचवण्यासाठी प्रयत्न करावेत ही विनंती. जयंती निमित्त घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमात तसेच शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करून आपण या पुस्तकांचे वाटप करू शकता. आजच आपल्या किमान १०० प्रती आरक्षित कराव्यात. पुस्तके मिळवण्यासाठी 8424867070 या what’s app नंबर वर संपर्क करावा.



