महाराष्ट्र
आदित्य ठाकरेंनी ‘त्या” महिला पत्रकाराला दिली अशी वागणूक
एस.म्हात्रे
मुसळधार पावसामुळे रविवारी मुंबईतील विक्रोळी भागात दरड कोसळल्याची दुर्घटना समोर आली होती, ज्यात 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे घटनेची पाहणी करण्यासाठी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सुद्धा घटनास्थळी आले होते. त्यांच्या याच पाहणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात ते एका महिला पत्रकाराच्या मदतीला धावून आल्याचे पाहायला मिळाले. आदित्य ठाकरे पाहणी करत असताना सोबत काही माध्यम प्रतिनिधी सुद्धा तिथे उपस्थितीत होते. जाण्यासाठी जागा छोटी होती आणि त्यात पायऱ्यांवर पावसाचे पाणी सुद्धा होते.
Minister @AUThackeray Truly a Gentleman Allowed a Female Journalist @urvashikhona to Walk first and from Steps Side Because other Side was Slide and She Could have Fall in Rush #VIKHROLI #landslide pic.twitter.com/WfCHpAdIZx
— Amir khan (@AmirReport) July 18, 2021



